Tuesday, August 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कदमवाकवस्तीच्या माजी सरपंच दाम्पत्यासह 14 जणांवर गुन्हा दाखल; ‘बाऊन्सर’ घेऊन जमिनीवर ताबा मिळवण्याचा केला प्रयत्न?

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 30 June 2026, 13:03

लोणी काळभोर, ता. ३० : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या जमीन वादाला सोमवारी (ता. २९) हिंसक वळण लागले आहे. न्यायप्रविष्ट असलेल्या वडिलोपार्जित शेतीमध्ये १० ते १२ बाऊन्सर, ट्रॅक्टर, क्रेन आणि वाहनांचा ताफा घेऊन घुसून जबरदस्तीने कब्जा करण्याचा प्रयत्न, उभ्या पिकांची नासधूस, महिलांना शेतातून बाहेर ढकलणे, विरोध करणाऱ्या युवकांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कदमवाकवस्तीच्या माजी सरपंच दाम्पत्यासह १४ जणांविरुद्ध गुन्हा लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड, त्यांच्या पत्नी तथा माजी सरपंच गौरी गायकवाड, मुलगा ओम गायकवाड, एका नातेवाईक महिलेसह १० ते १२ अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सविता दादासो झगडे (वय ५०, रा. महादेव मंदिराशेजारी, कवडीगाव, कदमवाकवस्ती) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झगडे कुटुंब गेल्या सुमारे ७५ वर्षांपासून गट क्रमांक ४२४ मधील ७४ गुंठे जमीन कसत आहे. ही जमीन पूर्वी देवस्थानला बक्षीसपत्राने देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर देवस्थानकडूनच ती शेती खंडाने झगडे कुटुंबाकडे देण्यात आली असून आजही त्यांच्याच ताब्यात व वहिवाटीत असल्याचा दावा फिर्यादी सविता झगडे यांनी केला आहे. या जमिनीच्या फेरफार, मोजणी आणि मालकीसंदर्भातील वाद सध्या जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही आरोपींनी जबरदस्तीने कब्जा करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

दरम्यान, सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सविता झगडे, त्यांच्या जाऊ मंगल झगडे व इतर कुटुंबीय शेतात मुळ्याचे पीक खुरपत होते. त्याचवेळी चित्तरंजन गायकवाड, गौरी गायकवाड, ओम गायकवाड, नातेवाईक महिला आणि १० ते १२ अनोळखी व्यक्ती इनोव्हा, आय-१० कार, ट्रॅक्टर आणि छोटा हत्ती टेम्पोसह शेतात आले. “ही जमीन आमची आहे, तात्काळ बाहेर पडा,” असे सांगत बाऊन्सरच्या मदतीने सविता झगडे व मंगल झगडे यांना जबरदस्तीने हाताला धरून शेताबाहेर ढकलण्यात आले. या धक्काबुक्कीत सविता झगडे यांना चक्कर आली.

फिर्यादी सविता झगडे या तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जात असतानाच कुटुंबीयांकडून फोनवर माहिती मिळाली की, आरोपींनी ट्रॅक्टरने शेत नांगरून मुळा व मक्याचे उभे पीक उद्ध्वस्त करण्यात आले असून शेतीसाठी टाकलेली पाण्याची पाइपलाइनही तोडण्यात आली आहे. सायंकाळी सुमारे सात वाजता कुटुंबीय पुन्हा शेतात गेले असता, तेथे क्रेनच्या सहाय्याने डेमो हाऊस उभारले जात असल्याचे दिसून आले. त्यास हर्षल झगडे व प्रणव झगडे यांनी विरोध केला असता, ओम गायकवाड आणि त्यांच्यासोबतच्या ७ ते ८ बाऊन्सरनी त्यांना मारहाण केली. तसेच “पुन्हा शेतात दिसलात तर जिवे मारू,” अशी धमकी देत शिवीगाळ केली आहे. अशी तक्रार सविता झगडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे.

त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चित्तरंजन गायकवाड, गौरी गायकवाड, ओम गायकवाड, एका नातेवाईक महिलेसह १० ते १२ अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२९(३), ३५२, ११५(१), ३५१(२), ३५१(३), १८९(१), १८९(२), १९० आणि ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, दोन्ही पक्षांच्या दाव्यांची पडताळणी केली जात आहे. या घटनेमुळे कदमवाकवस्ती परिसरात मोठी खळबळ उडाली असून, न्यायप्रविष्ट जमिनीच्या वादाने पुन्हा एकदा गंभीर वळण घेतल्याची परिसरात चर्चा सुरू आहे.

“सदर जमीन आम्ही अधिकृत खरेदीखत करून घेतलेली असून, शासनामार्फत तिची अधिकृत मोजणीही झाली आहे. संबंधित जमीन सध्या आमच्या कायदेशीर ताब्यात आहे. तरीदेखील समोरील पक्षाकडून जाणूनबुजून आम्हाला त्रास देण्याचे काम सुरू आहे. मी राजकारणात कार्यरत असल्यामुळे माझी बदनामी करण्याच्या उद्देशाने वारंवार खोटे आरोप करण्यात येत आहेत. माझ्याकडे जमिनीची अधिकृत ‘क’ प्रत आणि इतर सर्व कायदेशीर कागदपत्रे उपलब्ध आहेत.  यापूर्वी दोन वेळा माझ्या जमिनीचे कंपाउंड तोडण्यात आले असून, त्याबाबत मी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. मात्र, त्या तक्रारींवर अद्याप अपेक्षित कारवाई झालेली नाही. जर संबंधितांना आमच्या जमिनीबाबत कोणतीही हरकत असेल, तर त्यांनी शासनामार्फत अधिकृत मोजणी करून घ्यावी. त्या मोजणीत माझ्या ताब्यात त्यांच्या मालकीची जमीन आढळल्यास, कायद्यानुसार ती परत देण्यास आम्ही पूर्णपणे तयार आहोत. मात्र, खोटे गुन्हे दाखल करून आणि चुकीचे आरोप करून माझी व माझ्या कुटुंबाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व आरोपांचा आम्ही कायदेशीर मार्गाने सामना करू.”
गौरी गायकवाड (माजी सरपंच, कदमवाकवस्ती)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

खंडाळा घाटात थरारक अपघात! रस्ता नसताना कार नेली अन् ५० फूट खोल दरीत कोसळली; एका झाडामुळे वाचला जीव

Monday, 3 August 2026, 22:58

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्टीचा पर्दाफाश; तंबाखूजन्य पदार्थ व साहित्याचा मोठा साठा जप्त

Monday, 3 August 2026, 22:30

मामाने सोयरीक मोडल्याने डोकं सटकलं अन् सख्ख्या मामाच्याच बाळाचं अपहरण केलं; रिक्षातच बाळाला सोडून तरुण फरार…

Monday, 3 August 2026, 21:55

यवत पोलिसांची अवैध दारू व्यवसाय विरोधात धडक कारवाई; एकाच दिवशी ६ गुन्हे दाखल, एकूण ८५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

Monday, 3 August 2026, 21:08

पोलिसांनी रस्त्यावर धिंड काढली, भरचौकात उठाबशा काढायला लावल्या पण आता प्रकरण आलं अंगलट! सिनेस्टाइल कारवाई करणं भोवलं

Monday, 3 August 2026, 20:56

अन् चालत्या बसमध्येच दोनदा विनयभंग! एकट्या महिलेचा रात्री ट्रॅव्हल्समधून प्रवास, बस कर्मचाऱ्याची नियत फिरली आणि नको तिथे हात लावत…

Monday, 3 August 2026, 20:08
Next Post

Level Up Casino – Leading Slots and Providers in Australia

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.