युनूस तांबोळी
शिरूर : “जागरुक पालक, सदृढ बालक” हा उपक्रम शासनाचा असून या उपक्रमात बालके ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी जाऊन तपासणी करणार आहे. या तपासणीत कोणाला ही आजार असल्यास त्याच्यावरील उपचार हे शासनाच्या विविध योजनेनुसार किंवा शासनाशी संलग्न असणाऱ्या खाजगी रूग्णालयात मोफत केले जातील. हा उपक्रम आठ आठवडे सुरू राहणार असल्याची माहिती वैद्यकिय अधिकारी डॅा. नामदेव पानगे यांनी दिली.
कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कवठे येथे “जागरुक पालक, सदृढ बालक” तसेच माता सुरक्षित तर घर सुरक्षित मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य डॅा.कल्पना पोकळे, सरपंच सुनिता पोकळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी स्रिरोग तज्ज्ञ डॉ. अनुराग भोंडवे, डॉ. राजेश कट्टीमणी, डॅा. कोमल राठोड, डॅा. दिपाली जाधव, दिपक पोकळे, बापू भागवत, आरोग्य सेविका विद्या लोखंडे, केशर घोडे, पुष्पा बरडे,, सुनीता जगदाळे, आबासाहेब सरोदे, हिना तांबोळी, वनीता केदारी, मयुर नरवडे, अमृता नेवासकर, रूपाली भोर, जयश्री सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
“जागरुक पालक, सदृढ बालक” हि मोहिम आजपासून पुढील दोन महिने अंगणवाडी व शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत ० ते १८ वर्षावरील सर्व बालकांची आरोग्य तपासणी, प्रयोगशाळा तपासणी, संदर्भ सेवा दिली जाणार आहे.
माता सुरक्षित तर घर सुरक्षित मोहिमेत १८ वर्षावरील सर्व महिलांना औषध उपचार व संदर्भ सेवा दिली जाणार आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक गोसावी यांनी केले तर आभार बी. डी. पठारे यांनी मानले.
प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला महिलांसाठी मोफत आरोग्य सेवा डॅा. भोडवे यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाईल. प्रत्येक महिण्याच्या गूरूवारी
डॅा. मनोहर डोळे फाऊंडेशन तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केले आहे.