Thursday, November 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : शिवाजीनगर न्यायालयाबाहेर गोळीबार व कोयत्याने हल्ला करणारा आरोपी यवत पोलिसांच्या जाळ्यात

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 26 November 2026, 18:10

यवत, ता. 26 : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर भरदिवसा गोळीबार करून कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी फरार असलेल्या एका 19 वर्षीय आरोपीला यवत पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.

प्रथमेश दीपक येनपुरे (वय 19, रा. कात्रज, पुणे; मूळ रा. पावे, ता. वेल्हा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कानगाव येथील पोलीस पाटील आणि ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी कडेठाण (ता. दौंड) परिसरातून त्याचा शोध घेतला. आरोपीच्या अंगझडतीत गावठी पिस्तुलासाठी वापरली जाणारी एक रिकामी लोखंडी मॅगझीन आढळून आली असून ती जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणी गोळीबार करून कोयत्याने वार करत दहशत निर्माण करण्याची घटना घडली होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यानंतर प्रथमेश येनपुरे फरार झाला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे शहर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू होता. दरम्यान, प्रथमेश येनपुरे हा यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कडेठाण (ता. दौंड) गावाच्या परिसरात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती यवत पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशाने यवत पोलिसांचे पथक तातडीने कडेठाण येथे दाखल झाले. तेथे पोलीस पाटील आणि ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी शोधमोहीम राबवून प्रथमेश येनपुरे याला ताब्यात घेतले.

दरम्यान, त्याची अंगझडती घेतली असता गावठी पिस्तुलासाठी वापरण्यात येणारी एक रिकामी लोखंडी मॅगझीन मिळून आली. पोलिसांनी ती जप्त केली आहे. ताब्यात घेतलेल्या प्रथमेश येनपुरे याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पुणे शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या कारवाईमुळे फरार आरोपीचा शोध घेण्यात यवत पोलिसांना यश आले आहे.

सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर कदम, सहायक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र फनसे, पोलीस हवालदार संदिप देवकर, रॉकी देवकाते, पोलीस शिपाई प्रतिक जगताप, धिरज जाधव, दिनेश लोणकर, विनित कुन्हाडे व पोलीस पाटील विठ्ठल बारवकर यांचे पथकाने केली आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Breaking News : शिवाजीनगर न्यायालयाबाहेर गोळीबार व कोयत्याने हल्ला करणारा आरोपी यवत पोलिसांच्या जाळ्यात

Thursday, 26 November 2026, 18:10

शिवाजीनगर कोर्ट हल्ला प्रकरणात मोठी अपडेट! २ दिवसांत सुपारी देऊन कट रचला ; ९ पैकी ८ आरोपी ताब्यात, न्यायालयाकडून ६ दिवसांची पोलीस कोठडी

Thursday, 26 November 2026, 18:06

कॉलेजला जाते सांगून घरातून निघाली अन् घरी परतलीच नाही! सोरतापवाडीतील 18 वर्षीय तरुणी बेपत्ता, उरुळी कांचन पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल

Thursday, 26 November 2026, 17:34

उरुळी कांचन येथील एचडीएफसी बँकेसमोरील डिव्हायडरवर बुलेट घसरली; तरुणाचा 12 दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू, मित्रही जखमी..

Thursday, 26 November 2026, 17:18

मी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करते की…” पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर सुप्रिया सुळे आक्रमक; देवेंद्र फडणवीसांकडे केली मोठी मागणी

Thursday, 26 November 2026, 17:16

खराडीतील ‘महाट्रेड’ आणि ‘ट्रेडवे’ अॅपच्या माध्यमातून कोट्यवधींची फसवणूक!

Thursday, 26 November 2026, 17:03
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp