Thursday, November 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खराडीतील ‘महाट्रेड’ आणि ‘ट्रेडवे’ अॅपच्या माध्यमातून कोट्यवधींची फसवणूक!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 26 November 2026, 17:03

खराडी, ता. 26 : शेअर बाजारात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए.आय.) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ट्रेडिंग करून महिन्याला 15 ते 20 टक्के हमखास नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ‘महाट्रेड’ आणि ‘ट्रेडवे’ या अॅपच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात 28 गुंतवणूकदारांची एकूण 2 कोटी 28 लाख 88 हजार 950 रुपयांची गुंतवणूक झाली असून, त्यापैकी 1 कोटी 61 लाख 64 हजार 409 रुपयांची रक्कम परत न मिळाल्याची तक्रार खराडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

महेश सुरेश जाधव (वय 31, रा. हडपसर) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाट्रेड कंपनीचे सुहास जालिंदर रायकर आणि देविदास जालिंदर रायकर यांनी खराडीतील सिटी व्हिस्टा इमारतीत कार्यालय सुरू करून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. ए.आय. आधारित ट्रेडिंग अॅपद्वारे गुंतवणूक केल्यास सहा महिन्यांत रक्कम दुप्पट करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच नवीन गुंतवणूकदार आणल्यास एक टक्का कमिशन देण्याचेही आमिष दाखवण्यात आले.

जाधव यांनी स्वतःचे तसेच पत्नीचे पैसे मिळून महाट्रेड अॅपमध्ये 5 लाख 10 हजार रुपये गुंतवले. मात्र, त्यांना केवळ एक हजार रुपये परत मिळाले. डिसेंबर 2025 पासून गुंतवणूकदारांना मुद्दल आणि नफा मिळणे बंद झाले. त्यानंतर बँक खाती होल्ड झाल्याचे कारण देत पैसे परत करण्यासाठी वारंवार मुदत मागण्यात आली. मे 2026 मध्ये महाट्रेड अॅप बंद पडत असल्याचे सांगून ‘ट्रेडवे’ नावाचे नवीन अॅप सुरू करण्यात आले. त्यामध्येही गुंतवणूकदारांकडून पैसे स्वीकारण्यात आले. मात्र, ऑगस्ट 2026 मध्ये हे अॅपही बंद पडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

28 गुंतवणूकदारांचे पैसे अडकले
28 गुंतवणूकदारांनी एकूण 2 कोटी 28 लाख 88 हजार 950 रुपये गुंतवले होते. त्यापैकी 67 लाख 22 हजार 762 रुपये परत मिळाले असून, 1 कोटी 61 लाख 64 हजार 409 रुपये अद्याप मिळालेले नाहीत. आरोपींनी गुंतवणुकीची रक्कम प्रत्यक्ष शेअर ट्रेडिंगमध्ये न गुंतवता अन्यत्र वळवून अपहार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सुहास रायकर, देविदास रायकर, महाट्रेड कंपनीचे संबंधित संचालक तसेच अन्य सहकाऱ्यांविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, खराडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

खराडीतील ‘महाट्रेड’ आणि ‘ट्रेडवे’ अॅपच्या माध्यमातून कोट्यवधींची फसवणूक!

Thursday, 26 November 2026, 17:03

तहसीलदार बनसोडेंच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय मोर्चा; ‘जाणीवपूर्वक लक्ष्य केल्याचा’ आरोप

Thursday, 26 November 2026, 15:36

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! तब्बल १ लाख शेतकऱ्यांना मिळणार रिक्षा; ९० टक्के कर्ज, १० टक्के अनुदान आणि RTO फी पूर्णपणे माफ

Thursday, 26 November 2026, 15:05

बोपदेव घाटात भरधाव आयशर टेम्पोने विद्यार्थ्यांना चिरडले; ३ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू, तर २ गंभीर जखमी!

Thursday, 26 November 2026, 14:48

मुंबई-अलिबाग ४ तासांचा प्रवास आता अवघ्या ४५ मिनिटांत! तब्बल ४५ वर्षांची प्रतीक्षा संपणार; धरमतर खाडीवर साकारतोय महाकाय समुद्री पूल

Thursday, 26 November 2026, 14:20

भोरमध्ये भीषण अग्नितांडव! एक-दोन नव्हे तर तब्बल 8 घरे जळून खाक; लाखोंचे नुकसान

Thursday, 26 November 2026, 13:41
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp