सागर जगदाळे

भिगवण: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तक्रारवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर व नागरिकांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन केले.

अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि लेखणीतून समाजातील कष्टकरी, वंचित व उपेक्षित घटकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. त्यांच्या साहित्याने सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देत सामान्य माणसाच्या संघर्षाला आवाज दिला. जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्यिक व सामाजिक योगदानाचे स्मरण करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या मेघना तुकाराम बंडगर, इंदापूर पंचायत समिती सदस्य हेमाताई पद्माकर माडगे व तक्रारवाडीचे सरपंच शरद तात्या वाघ, माजी सरपंच सतीश वाघ, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण वाघ, भाजपाचे तेजस देवकाते, दिनेश मारणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष सचिन खंडाळे व आयोजक नवनाथ पाटोळे यांनी केले होते. कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.







