विजय लोखंडे
पुणे : मुळा मुठा नदीवरील हिंगणगाव-खामगाव टेकला जोडणाऱ्या पुलाचा भूमिपूजन शुभारंभ सोहळा संपन्न झाला असून यामुळे पूर्व हवेली तालुक्यातील २५ गावांचा वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे. यापुढे या भागात वर्दळ वाढून दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. याचा आम्हालाही आनंद आहे. अशीच अनेक विकासकामे अजूनही जनतेसाठी करीत राहणार असल्याचे आश्वासन हिंगणगाव-खामगाव टेकला जोडणारा या पुलाचा भूमिपूजन शुभारंभ सभेत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपस्थित जनतेला दिले.
अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या हवेली व दौंड तालुक्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या मुळा मुठा नदीवरील हिंगणगाव-खामगाव टेक सह तालुक्यातील दळणवळण वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या पुलाच्या कामासाठी राज्य सरकारची मंजुरी मिळाली. त्यानंतर २१ कोटी,६८ लाख,५५ हजार निधी मंजूर झालेल्या भव्य पुलाचा भूमिपूजन शुभारंभ माजी खासदार तथा म्हाडाचे अध्यक्ष शिवाजी आढळराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पिडीसीसी संचालक प्रदिप कंद, भाजपचे क्रीडा प्रदेशाध्यक्ष पै. संदिप भोंडवे, यशवंत कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप यांच्या हस्ते पार पडले .
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन पाटील, जिल्हा नियोजनचे सदस्य प्रवीण काळभोर, शिवसेना(शिंदे गट) पक्षाचे हवेली तालुका प्रमुख तथा महाराष्ट्र राज्य वीज महावितरण समितीचे सदस्य विपुल शितोळे, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मुळा मुठा नदीवरील हिंगणगाव-खामगाव टेकला जोडणाऱ्या पुलामुळे महत्वाच २५ गावच्या वाहतुकीचा प्रश्न मिटणार असून दळणवळणास मोठी चालना मिळणार आहे. यामुळे या हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील खामगाव टेक, हिंगणगाव,टिळेकर वाडी,शिंदेवाडी,जगतापवाडी, मिरवडी, नाव्ही सांडस, सांगवी सांडस, उरुळी कांचन, यासारख्या व दौंड तालुक्यातीलही अनेक गावांना पुढील काळामध्ये डेव्हलपमेंट साठी मोठी संधी मिळणार आहे.
प्रदिप कंद, संचालक पिडीसीसी बँक तथा माजी अध्यक्ष जिल्हा परिषद, पुणे