विजय लोखंडे
पुणे : अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या अनेक गावांना जोडणाऱ्या मुळा मुठा नदीवरील हिंगणगाव-खामगाव टेकसह अनेक गावांना जोडणाऱ्या हवेली व दौंड तालुक्यातील दळणवळण वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पुलाचा भूमिपूजन शुभारंभ आज ११ ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी ४:३० वाजता, हवेली तालुक्यातील हिंगणगाव येथे होणार आहे.
या मुळा मुठा नदीवरील हिंगणगाव-खामगाव टेकला जोडणाऱ्या पुलामुळे महत्वाच वाहतुकीचा प्रश्न मिटणार असून दळणवळणास मोठी चालना मिळणार आहे. यामुळे या हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील खामगाव टेक, हिंगणगाव, टिळेकर वाडी, शिंदेवाडी, जगतापवाडी, मिरवडी, नाव्ही सांडस, सांगवी सांडस, उरुळी कांचन, यासारख्या व दौंड तालुक्यातीलही अनेक गावांना पुढील काळामध्ये डेव्हलपमेंटसाठी मोठी संधी मिळणार आहे. या पुलाचा आज संध्याकाळी ४:३० वाजता भूमिपूजन शुभारंभ पार पडणार आहे.