केडगाव : राज्यस्तरीय तिसरे भीमथडी मराठी साहित्य संमेलन रविवार (ता.16) आणि सोमवार (ता.17) जून 2024 रोजी केडगाव, चौफुला (ता. दौंड) येथे होत आहे. या साहित्य संमेलनात उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, ग्रंथदिंडी, परिसंवाद, प्रकट मुलाखत, कथाकथन, नाट्यप्रयोग, सांस्कृतिक, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत अशी माहिती संमेलनाचे मुख्य प्रवर्तक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य परिषद यांच्या वतीने दरवर्षी संमेलनाचे आयोजन करण्यात येते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला भीमथडी मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष रविंद्र खोरकर, सचिव दीपक पवार, परिषदेचे सदस्य कैलास आबा शेलार, राजाभाऊ जगताप, मोहन जाधव, रामचंद्र नातू, महाराष्ट्र राज्य तमाशा थिएटर मालक संघटनेचे अध्यक्ष डॉ.अशोकराव जाधव,डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान अध्यक्ष विनायक कांबळे, झोपडपट्टी सुरक्षा दल पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय डाडर, रानकवि जगदीश वनशिव, भाऊसाहेब फडके, नितिन भागवत, आनंदा बारवकर, बाळासाहेब मुळीक, सुशांत जगताप आदी उपस्थित होते.
या साहित्य संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल कुल, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रमेश थोरात, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे, विजयराव कोलते, वासुदेव काळे, महेश भागवत, सागर फडके, नितिन दोरगे, माउली ताकवने, राजाभाऊ तांबे, वसंत साळूखे, तानाजी केकाण, महेश पासलकर, डॉ.भरत खळदकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.लक्ष्मण हेंबाडे, आप्पासाहेब पवार, वैशाली नागवडे आदी उपस्थित राहणार आहेत.
दोन दिवस चालणा-या या साहित्य संमेलनात मुक्कामी राहण्याची व जेवणाची सोय करण्यात येणार आहे. साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी कवी, लेखक, कलावंत यांनी 9881098481, 8805511060, 9850206977 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन भीमथड़ी मराठी साहित्य परिषद अध्यक्ष संजय सोनावणे व सचिव दीपक पवार यांनी केले आहे.