इम्रान आत्तार

भोर: भोर तालुक्यातील वेळवंडी नदीवर असलेले ब्रिटिशकालीन भाटघर धरण हे शंभर टक्के भरले असून 45 स्वयंचलित मोऱ्यांमधून पाण्याचा विसर्ग होत आहे भाटघर धरण १००% झाले असल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज दि.०२/०८/२०२६ भाटघर धरणाच्या विसर्गामध्ये वाढ होऊन धरणाच्या विद्युत निर्मिती केंद्राद्वारे १६१५ क्युसेक व सांडव्याद्वारे स्वयंचलित द्वारांमधून १००० क्युसेक विसर्ग असा एकूण २६१५ क्युसेक विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू आहे.

तसेच पावसाचे प्रमाण कमी/जास्त झाल्यास त्यानुसार येव्यामध्ये वाढ/घट झाल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी/जास्त करण्यात येईल. तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, कृपया नदीपात्रात उतरू नये नदीच्या पात्रात कुठल्या विभागाचे काम सुरू असेल तर त्या विभागाने बांधकाम साहित्य व कामगार यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. तसेच नदीच्या काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा. तसेच नदीपात्रात पिण्याच्या व शेतीसाठी असलेले पंप सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.







