बारामती, (पुणे) : बारामती येथील विमानतळानजिक ‘रेड बर्ड’ या कंपनीचे शिकाऊ विमान कोसळले असून यामध्ये एक पायलट किरकोळ जखमी झाला आहे. तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हि घटना गुरुवारी (ता. १९) गुरुवारी घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. १९) दुपारच्या सुमारास लँडीग करत असताना हा अपघात झाला. या अपघातात एक पायलट किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, विमानतळाच्या हद्दीतच विमान कोसळल्याने इतर कोणतीही दुर्घटना घडली नाही. या अपघातात विमानाचे नुकसान झालेले असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
अपघाताचे कारण गुलदस्त्यात..
या विमानाचा अपघात नेमक्या कोणत्या कारणाने झाला, याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. तांत्रिक बिघाडाने अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर येथे गर्दी वाढू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आले. दरम्यान या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी यासंबंधी बोलण्यास नकार दिला. काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी फोन बंद ठेवले.