Monday, October 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शंखनादाच्या निनादात बाप्पाला निरोप; हडपसर पोलिसांची आदर्श गणपती विसर्जन मिरवणूक

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 23 September 2026, 13:01

हडपसर, ता. 23 : गणेश विसर्जन मिरवणूक पारंपरिक, शिस्तबद्ध आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारी कशी असावी, याचे उत्तम उदाहरण हडपसर पोलिसांनी यंदा घालून दिले. हडपसर पोलिस ठाण्याच्या वतीने भव्य विसर्जन मिरवणुकीचे आयोजन मंगळवारी (ता. 22) करण्यात आले होते. शंखनाद, ढोलपथक, शौर्य पथक, तुतारी आणि सनईच्या मंगलमय स्वरांनी परिसर दुमदुमून गेला. या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले ते केशव शंखनाद पथकाचे शंखवादन. पारंपरिक शंखनादाच्या माध्यमातून नागरिकांना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. शंखनादाच्या माध्यमातून गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

केशव शंखनाद पथक हे पुण्यातील प्रसिद्ध सांस्कृतिक व सामाजिक पथक असून, शंखवादनाच्या पारंपरिक कलेचे जतन आणि प्रसार करण्याचे काम करते. या पथकाने एकाच वेळी मोठ्या संख्येने शंखवादक सहभागी करून शंखवादनाचा विश्वविक्रम नोंदविल्याची माहिती देण्यात आली. विविध मानाच्या गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका आणि धार्मिक कार्यक्रमांमध्येही या पथकाचे शंखवादन झाले आहे.

मिरवणुकीदरम्यान शंखनादाचे धार्मिक, सांस्कृतिक तसेच आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व नागरिकांना समजावून सांगण्यात आले. शंखवादनामुळे श्वसनक्रियेला चालना मिळण्यासह मानसिक शांतता मिळण्यास मदत होते, असा संदेशही देण्यात आला. यासोबतच शौर्य पथकाच्या सादरीकरणातून महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला. महिलांनी सादर केलेल्या विविध प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्रीयन पारंपरिक पेहराव, तुतारी आणि सनईचे वादन यामुळे मिरवणुकीला विशेष पारंपरिक रंगत आली.

दरम्यान, हडपसर पोलिसांनी आयोजित केलेल्या या विसर्जन मिरवणुकीत उत्सवाचा आनंद, भारतीय संस्कृतीचे संवर्धन, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक प्रबोधन यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि भक्तिमय वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे, सोलापूर, सातारा प्रवास आता सुपरफास्ट! पालखी मार्गांचं काम अंतिम टप्प्यात; कृषी अन् औद्योगिक क्षेत्रांना मिळणार चालना…

Monday, 12 October 2026, 21:34

पुणेकरांनो दिवाळीला गावी जायचंय पण गर्दीचं टेन्शन येतंय? पुणे एसटी विभागाचा महत्वाचा निर्णय; ६०० विशेष गाड्यांची सोय

Monday, 12 October 2026, 21:30

“संविधानाचा अनादर सुरू आहे!” दिल्ली-मुंबईतील आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची मोठी प्रतिक्रिया

Monday, 12 October 2026, 20:22

तिसऱ्याच्या भांडणात मध्यस्थी केली अन् स्वतःच खाल्ला मार! पुण्यात ‘माझ्या आईला शिव्या देतो का?’ म्हणत तरुणाच्या डोक्यात सपासप वार

Monday, 12 October 2026, 20:15

बारामतीत सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! सोमेश्वर कारखान्यावर पुन्हा एकदा एकहाती वर्चस्व; पुरुषोत्तम जगताप हे तब्बल 6,4,64 मतांनी पराभूत..

Monday, 12 October 2026, 19:53

चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना जामखेडमधून अटक; सहा गुन्हे उघड, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

Monday, 12 October 2026, 19:09
Next Post

“साहेब, लै नुकसान झालं” मुख्यमंत्र्यांसमोरच शेतकऱ्याचा हंबरडा; फडणवीसांनी छातीशी कवटाळून धीर दिला; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp