शिरूर : खुनाच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. मेंढे साहेब यांनी ७५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. बाप्पू भिमाजी तरटे असे जामीन मंजूर केलेल्या आरोपीचे नाव आहे.
शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये न्हावरा-केडगाव रोडवरील पारगाव पुलाखाली भिमा नदीपात्रात एका अनोळखी व्यक्तीचा २९ ऑक्टोबर रोजी मृतदेह आढळून आला होता. मृत व्यक्तीच्या अंगावर आणि गळ्यावर मारहाणीच्या खुणा दिसुन आल्या होत्या, त्यानुसार शिरुर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलिस तपासात सदर मृतदेह संतोष गाडेकर याचा असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी तपास करून बाप्पु तरटे याला अटक करून येरवडा कारागृहात रवानगी केली होती. येरवडा कारागृहात असताना आरोपीने जामीन मिळविण्यासाठी ॲड विपुल विजयानंद दुशिंग, ॲड श्रेयश सुरेश गवळी यांच्यामार्फत पुणे येथील सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
ॲड. विपुल दुशिंग यांनी न्यायालयात आरोपीची बाजू मांडताना, आरोपी विरुद्ध कोणताही पुरावा नसून त्याला खोट्या गुन्ह्यात अडकविले आहे. केवळ संशयावरून एखाद्याला तुरुंगात ठेवता येणार नाही, असा युक्तिवाद ॲड विपुल दुशिंग यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला.