Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दत्तकला महाविद्यालयातील कर्मचाऱ्याच्या गळ्याला दोरी आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न; हर्षवर्धन झोळसह दोघांविरुद्ध दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 27 August 2026, 19:44

भिगवण, ता. 27 : कुर्डूवाडी (ता. माढा) येथील कथित अंधश्रद्धा व जादूटोणा प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या मनोहर भोसले प्रकरणाला आता आणखी एक धक्कादायक वळण मिळाले आहे. स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेशी संबंधित एका कर्मचाऱ्याला “आमच्याविरुद्ध जबाब का देतोस? जबाब दिलास तर तुला आणि तुझ्या घरच्यांना बघून घेईन,” अशी धमकी देऊन त्यानंतर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दौंड पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षवर्धन नवनाथ झोळ (रा. वाशिंबे, ता. करमाळा, जि. सोलापूर) आणि अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महेश चर्तुभुज गायकवाड (वय 28, सध्या रा. दत्तकला कॉलेज, बाईज हॉस्टेल ता. दौंड जि. पुणे मुळ रा. निलज ता. करमाळा जि. सोलापुर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तकला महाविद्यालयातील स्टाफच्या मोबाईलवरून हर्षवर्धन झोळ याने महेश गायकवाड यांच्याशी 25 ऑगस्ट रोजी दुपारी फोनवर संपर्क साधला. यावेळी “आमच्याविरुद्ध तू का जबाब देत आहेस? आमच्याविरुद्ध जबाब दिलास तर तुला आणि तुझ्या घरच्यांना बघून घेईन,” अशी धमकी दिली.

त्यानंतर 26 ऑगस्ट रोजी सकाळी सोलरच्या कामासाठी स्वामी चिंचोली येथे गेलेल्या गायकवाड यांना हर्षवर्धन झोळ आणि अन्य दोन अनोळखी व्यक्ती दिसल्या. त्यांच्याजवळ जाताच तिघांनी कानाखाली मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीतून बचाव करण्यासाठी गायकवाड यांनी त्यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, हर्षवर्धन झोळ याने एका हाताने गचांडी पकडून दुसऱ्या हातातील दोरी गायकवाड यांच्या गळ्यात टाकून ती आवळण्याचा प्रयत्न केला. यावेळी गायकवाड यांनी हिसका देऊन तेथून पळ काढला आणि थेट भिगवण पोलिस ठाणे गाठले. मात्र, घटनास्थळ दौंड पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने त्यांनी दौंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 351(2), 352, 115(2), 232, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गवळी करीत आहेत.

मनोहर भोसले प्रकरणाशी कनेक्शनमुळे चर्चेला उधाण

स्वतःला बाळूमामाचा अवतार म्हणवून घेत भक्तांना भविष्य बदलण्याचे आमिष दाखविल्याच्या आरोपांमुळे चर्चेत असलेला मनोहर भोसले ऊर्फ मनोहर मामा सध्या आर्थिक फसवणूक प्रकरणात अटकेत आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी आर्थिक फसवणूक, भोंदूगिरी आणि बलात्कारासह गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

 

दरम्यान, कुर्डूवाडी येथील अंधश्रद्धा व जादूटोणा प्रकरणात दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. रामदास मधुकर झोळ यांच्यासह तिघांना सहआरोपी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी दोघांना अटक झाली असून प्रा. रामदास झोळ अद्याप फरार असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच रामदास झोळ यांचे पुतणे हर्षवर्धन झोळ यांच्याविरुद्ध धमकी, मारहाण आणि गळा आवळण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने दत्तकला शिक्षण संस्थेचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणाचा मनोहर भोसले प्रकरणाशी नेमका संबंध काय आहे, याबाबत पोलिस तपासातून पुढील माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिंपळवंडीतील बालिकेवर अत्याचार-हत्या प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून पीडित कुटुंबाची भेट; प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार

Thursday, 27 August 2026, 22:55

पुणेकरांनो काळजी घ्या! शहरात डेंग्यू अन् स्वाईन फ्लूचा विळखा तीव्र; अवघ्या २५ दिवसांत नोंदवले गेले तब्बल २०५ रुग्ण

Thursday, 27 August 2026, 22:36

अखेर पुणेकरांची प्रतिक्षा संपणार! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कधी धावणार? तारीख ठरली; प्रशासनाची धावपळ

Thursday, 27 August 2026, 22:18

लोणी काळभोर येथील अट्टल गुन्हेगार राज पवार एक वर्षासाठी अमरावती कारागृहात स्थानबद्ध

Thursday, 27 August 2026, 21:53

सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा! उष्णता वाढणार अन् पावसाची तूट निर्माण होणार; हवामान तज्ज्ञांचा इशारा

Thursday, 27 August 2026, 21:32

भिगवणच्या अशोक लॉजमध्ये वेश्यागमन? नागरिकांमधून संताप व्यक्त; पहा व्हायरल Video

Thursday, 27 August 2026, 20:39
Next Post

१७ वर्षांचा संसार तरी सासरी छळ! पैसा, प्रॉपर्टीच्या हव्यासापायी सासरच्यांनी गाठली पातळी; वडिलांनी सगळंच सांगितलं....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp