Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

१७ वर्षांचा संसार तरी सासरी छळ! पैसा, प्रॉपर्टीच्या हव्यासापायी सासरच्यांनी गाठली पातळी; वडिलांनी सगळंच सांगितलं….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 27 August 2026, 20:01

पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवड परिसरात विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. वाकड परिसरात राहणाऱ्या शिल्पा गवारे-कलाटे यांनी रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला जीवन संपवल्याची घटना समोर आली. शिल्पाच्या मृत्यूप्रकरणी तिच्या पतीसह सासू-सासरे आणि दिराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शिल्पाच्या आई-वडिलांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत.

शिल्पा यांचा सचिन गवारे यांच्यासोबत २००९ मध्ये मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर लगेचच कुटुंबीयांना सचिन यांच्याबाबत धक्कादायक माहिती समजल्याचा दावा शिल्पाच्या आई-वडिलांनी केला. सचिन एका खून प्रकरणात मुख्य आरोपी असल्याने फरार झाल्याचे त्यांना समजले होते. मात्र, लग्न मोडण्यापेक्षा मुलगी सासरीच राहावी, असा निर्णय त्यांनी घेतला. याच निर्णयाचा आज पश्चात्ताप होत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

शिल्पाचे वडील गुलाब कलाटे यांनी सासरच्या मंडळींवर संपत्तीच्या हव्यासाचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, शिल्पाच्या सासऱ्याने आपल्या सासरच्या मालमत्तेवर हक्क मिळवला होता आणि आपल्या मुलांनाही त्याच पद्धतीने वागण्याचे शिकवले. दोघेही बाप-लेक दारू पित असल्याचाही आरोप त्यांनी केला. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शिल्पाच्या आई रतन कलाटे यांनीही मुलीच्या शेवटच्या दिवसांबाबत माहिती दिली. घटनेच्या आदल्या दिवशी शिल्पा कपडे बदलण्यासाठी माहेरी आली होती. गाडीत बसताना तिने आई-वडिलांकडे हात केला. त्यानंतर ती घरी का थांबली नाही, असे विचारले असता घरी स्वयंपाक करायचा असून लहान मूल घरी असल्याचे तिने सांगितले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास पुन्हा पती-पत्नीमध्ये वाद झाल्याचा फोन आल्याचे रतन कलाटे यांनी सांगितले.

 

शिल्पाला पतीकडून मारहाण होत असल्याचेही आईने सांगितले. तिच्या डोक्यात इस्त्री मारणे आणि शरीराला चटके देणे असे प्रकार होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, शिल्पाने याबाबत कधीही स्पष्टपणे सांगितले नव्हते. ती दुखापतीचे कारण पातेलं किंवा कुकर लागल्याचे सांगत असल्याने कुटुंबीयांना परिस्थितीची पूर्ण कल्पना आली नाही. अलीकडेच तिने काही गोष्टी सांगण्यास सुरुवात केली होती, असेही आईने म्हटले.

दरम्यान, या प्रकरणात पती सचिन गवारे, सासू-सासरे आणि दिराविरोधात कठोर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिल्पाचा मृत्यू संशयास्पद असल्याने शवविच्छेदनादरम्यान व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण आणि या प्रकरणातील आरोपांची सत्यता पुढील तपासात स्पष्ट होणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पिंपळवंडीतील बालिकेवर अत्याचार-हत्या प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून पीडित कुटुंबाची भेट; प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार

Thursday, 27 August 2026, 22:55

पुणेकरांनो काळजी घ्या! शहरात डेंग्यू अन् स्वाईन फ्लूचा विळखा तीव्र; अवघ्या २५ दिवसांत नोंदवले गेले तब्बल २०५ रुग्ण

Thursday, 27 August 2026, 22:36

अखेर पुणेकरांची प्रतिक्षा संपणार! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कधी धावणार? तारीख ठरली; प्रशासनाची धावपळ

Thursday, 27 August 2026, 22:18

लोणी काळभोर येथील अट्टल गुन्हेगार राज पवार एक वर्षासाठी अमरावती कारागृहात स्थानबद्ध

Thursday, 27 August 2026, 21:53

सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा! उष्णता वाढणार अन् पावसाची तूट निर्माण होणार; हवामान तज्ज्ञांचा इशारा

Thursday, 27 August 2026, 21:32

भिगवणच्या अशोक लॉजमध्ये वेश्यागमन? नागरिकांमधून संताप व्यक्त; पहा व्हायरल Video

Thursday, 27 August 2026, 20:39
Next Post

भिगवणच्या अशोक लॉजमध्ये वेश्यागमन? नागरिकांमधून संताप व्यक्त; पहा व्हायरल Video

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp