दौंड : दौंड तालुक्यात सध्या विधानसभेचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आज महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारात रमेश थोरात यांचे चिरंजीव गणेश थोरात यांनी आज सकाळी केडगाव रेल्वे स्टेशन येथे दौंड-पुणे असा दररोज अप-डाऊन प्रवास करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. दौंड-पुणे दररोज अप-डाऊन प्रवास करणारे अनेक नागरिक केडगाव परिसरासह दौंड तालुक्यातील अनेक चाकरमानी, विद्यार्थी, व्यापारी हे दररोज सकाळी पुणे हडपसरच्या दिशेने जात असतात, परंतु दौंड पुणे प्रवास करण्यासाठी कमी गाड्या असल्याने प्रवाशांना अनेक अडचणी येतात. यावेळी गणेश थोरात यांनी त्यांच्याशी संपर्क साधला.
यावेळी प्रवासात अनेक अडचणी आणि त्रास होत असून त्यांच्या चेहऱ्यावर थकवा व चिंता नेहमीच पहात असल्याचे थोरात यांनी सांगितले. याच प्रवासात विद्यार्थ्यांही रोज शाळा आणि कॉलेजला जात असलेले विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला वेळेवर पोहोचण्यासाठी अडचणी येतात. विद्यार्थ्यांना शालेय जीवन सुरक्षित प्रवासाची आवश्यकता असून त्यांचा संघर्ष, कष्ट करण्याची इच्छाशक्ती, हेच आपल्याला प्रेरणा देतात. गेल्या अनेक वर्षांपासून दौंड-पुणे लोकल ट्रेनच्या समस्येवर उपाय अजून शोधला गेला नाही. पहाटे व दुपारी पुण्याकडे जाणारी गाड्या बंद झाल्या असल्याने प्रवाशांना समस्या निर्माण होत आहेत.
यावेळी दैनंदिन प्रवासी यांना येणाऱ्या समस्या जाणून घेतलया.