अजित जगताप
कराड : सामाजरत्न वाय डी माने चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने कराड तालुक्यातील घोगांव येथे महिला दिनाच्या निमित्ताने महिला बचत गटाच्या अंतर्गत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन ऍड. वाय .डी. तथा यादवराव माने यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आले होते.
महिलांच्या जीवनमानातील बदल, आरोग्यासाठी घ्यायची काळजी, संतुलित आहार, घरगुती उपाय तसेच व्यायाम या विषयांवर मुंबई येथील माजी वैद्यकीय अधिकारी व संस्थेच्या कार्यवाह डॉ. विद्या अरुण माने यांच्या वतीने महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. या मेळाव्यास महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या.
डॉ. विद्या माने यांनी यावेळी महिला बचत गट अजून सक्षम कशा प्रकारे करता येऊ शकेल, या संदर्भात महिलांचे प्रबोधन केले. ग्रामसेवक शिवाजी जाधव यांनी उपस्थित राहून संस्थेच्या कार्यसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला संस्थेच्या पुष्पलता माने, बाळसिध्द महिला ग्रामसंघ, घोगांव, ग्रामसंघाच्या अध्यक्षा रेखा साळुंखे, सचिव सुनंदा भावके, कोषाध्यक्षा माधुरी शिंदे, प्रेरिका रुपाली सुर्यवंशी व नीता शेवाळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी उत्कृष्टपणे कार्य करणाऱ्या अंगणवाडी व आशा कर्मचारी, विविध लघुउद्योगात आपले कर्तृत्व प्रस्थापित करणा-या हिराबाई सांळुखे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या माने यांनी तर आभार प्रदर्शन विजय माने यांनी केले.