लोणीकंद : लोणीकंद पोलीस स्टेशन, येथील सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांना एक लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ पकडण्यात आले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांचेविरुध्द दाखल अर्जामध्ये निल अहवाल पाठविण्यासाठी व त्यामध्ये तक्रारदार यांना भविष्यात त्रास न होण्यासाठी प्रथम ०५ लाखाची मागणी केली परंतु तडजोडीअंती एक लाख रुपये रुपयांची लाचेची मागणी पंचासमक्ष केल्याचे निष्पन्न झाले आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ अंतर्गत चेतन थोरबोले यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्र मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथील पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले तपास करीत आहेत.