उरुळी कांचन, (पुणे) : अष्टापूर (ता. हवेली) येथील अरविंद शिवराम कोतवाल (वय -57) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शनिवारी (ता. 24) सकाळी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, असा परिवार आहे.
थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना यांचे वेल्फेअर ऑफिसर म्हणून त्यांनी काम पाहिले होते. भाजपा युवा नेते व उद्योजक प्रशांत माणिक कोतवाल यांचे ते चुलते होत. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.