जुन्नर : उदापूर ता. जुन्नर येथील सरस्वती विद्यालयात इयत्ता आठवीमध्ये शिकणारा कुणाल आत्माराम बर्डे या विद्यार्थ्याला मार्च २०२४ मध्ये अर्धांगवायूचा झटका आला होता. त्याला उपचारासाठी डी. वाय. पाटील या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले असून उपचार चालू असताना त्याला जी.बी.एस. या गंभीर आजाराचे निदान झाले. तो पूर्ण बेशुद्ध होता. व्हेंटिलेटर आणि इतर महागडी औषधे यांचा खर्च व घरची परिस्थिती नाजूक असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी दानशूर व्यक्तींना आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
डॉ. संदेश राऊत यांनी स्वतः जातीने लक्ष घालून देशाचे माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार ऍग्रो संजीवनी यांच्या माध्यमातून त्या कुटुंबाला दोन लाखाची मदत केली आहे. उंब्रज येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश दांगट यांनी त्यांना शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून सात लाखाची मदत मिळवून दिली, तर नारायणगाव येथील प्रसिध्द सर्पदंश तज्ञ डॉ.सदानंद राऊत यांनी १ लाख रु.चे ऑक्सिजनचे मशीनही मोफत दिले आहे.
पुढच्या वैद्यकीय उपचारांसाठी आम्हाला मदतीची गरज आहे. तरी समाजातील सर्वच घटकांना व दानशूर व्यक्तींना आर्थिक मदत पाठविण्यासाठी श्री.आत्माराम बर्डे, उदापूर, तालुका – जुन्नर, जि.पुणे.यांच्या फोन नंबर ७३ ५० ३९ ८९ ७९ या फोनवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.