पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयास बेंगळुरू येथील नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडिटेशन कौन्सिल (नॅक) या राष्ट्रीय संस्थेकडून ‘A+’ ग्रेड (३.३३ Cumulative Grade Point Average (CGPA).) प्राप्त झाली आहे. नॅक पिअर टीमचे अध्यक्ष तिरूपती येथील श्री व्यंकटेश्वरा विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू डॉ. मात्चा भास्कर, समिती सदस्य समन्वयक मैसूर येथील विश्वेश्वरा टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. टीपी रेणुका मूर्ती, सदस्य तामिळनाडू येथील लोयला कॉलेजचे प्राचार्य डॉ. जेवीअर वेदाम एस. जे. यांनी दोन दिवस विविध विभाग, अध्ययन व अध्यापन प्रणाली, उपलब्ध पायाभूत सुविधा, संशोधन व नवप्रवर्तन प्रशासनाविषयी माहिती घेतली.
नॅकमधिल सातही मुद्द्यांच्या म्हणजेच अभ्यासक्रमाचे पैलु, अध्ययन अध्यापन मूल्यमापन, संशोधन व नवप्रवर्तन, पायाभूत सुविधा व अध्ययन प्रणाली, विद्यार्थी समर्थन व प्रगती, प्रशासन नेतृत्व आणि व्यवस्थापन, संस्थात्मक मूल्ये आणि सर्वोत्तम पद्धती या मुद्द्यांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच महाविद्यालयात आयोजित सांस्कृतिक, क्रिडा तसेच विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यविषयी माहितीचा आढावा घेतला याप्रसंगी विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक, प्राध्यापकांसह कर्मचारी यांची बैठक घेऊन संवाद साधला.
महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. रमाकांत जोशी, डॉ. लतेश डॉ. रवींद्र मेने, प्रा. अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे, धनंजय बागडे तसेच सर्व क्रायट्रिया प्रमुख, विभाग प्रमुख, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
या यशाबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम. पवार, सहसचिव ए. एम.जाधव यांनी प्राचार्य घोरपडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.