अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील उरळगाव येथील एका वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवून डाव्या कानाची पाळी कापून चोरट्यांनी महिलेकडील सव्वा दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले आहे. रतनबाई बापु थोरात (वय 55 वर्षे, रा. उरळगाव थोरातवस्ती, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
दिनांक 29 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजल्याच्या सुमारास उरळगाव (ता. शिरूर) गावच्या हद्दीतील माळरानाजवळ रतनबाई मेंढ्या चारत होत्या. तेव्हा तीन अनोळखी इसम मोटार सायकलवरुन वृद्ध महिलेजवळ आले असता त्यापैकी एकाने रतनबाईना यांना खाली पाडले आणि ओरडू नकोस नाहीतर चाकूने भोसकेन असा दम दिला.
त्यांतर त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसुत्र जबरदस्तीने तोडुन घेतले आणि सोबत हातातील चाकुनी डाव्या कानाची
पाळी कापुन रतनबाई यांना गंभीर जखमी करून दागिने लंपास केले. यासंदर्भात शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास पीएसआय उगले करीत आहेत.