इंदापूर : सत्ताधारी राजकारणी पक्षासह विरोधकांनादेखील “पुरोगामी चेहरा “ आत्मसात करण्यासाठी आंबेडकरी चळवळ व समाज आपल्या पक्षामध्ये निवडणुक काळात असणे आवश्यक व गरजेचे वाटते. फुले, शाहू आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांची चळवळ नेटाने पुढे चालविणाऱ्या नेतृत्वाला पक्षीय राजकारणात प्रवेश दिला जातो, मात्र तालुकास्तरावर त्यांना राजकीय प्रक्रियेत डावलले जात असल्याने आंबेडकरी जनतेत पक्षीय कार्यपध्दती बद्दल नाराजीची भावना निर्माण होताना दिसत आहे.
तालुक्यातील मागासवर्गीय समाजातील ‘दलितांच्या राजकारणाचे समाज कारणाचे दादूमिया’ म्हणून ओळख असणारे स्मृती शेष रत्नाकर मखरे (तात्या )पुर्वा श्रमीचे महार व आताचे नवबौध्द, मातंग, चर्मकार समाजातील व बहुजन समाजातील वंचित, अन्याय ग्रस्त,पिडीत लोकांना न्याय मिळवून देणारे, त्यांच्या आत्मसन्मानासाठी, स्वाभिमाना साठी प्रयत्न करणारे, फुले, शाहू,आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व करणारे” मखरे तात्या” त्यांचे पश्चात ही पहिलीच विधानसभा निवडणुक पार पडत आहे.
राज्यात राजकीय प्रक्रियेमध्ये मागासवर्गीय मतांची लक्षणीय वाढ आणि राजकीय पक्षांमधील सत्तेची तीव्र स्पर्धा यामुळे निवडणुक काळात निळा, पिवळा ध्वज स्वतः च्या पक्षाच्या ध्वजासोबत आवर्जून लावणे, मिरवणे ही बाब अपरिहार्य ठरत आहे. तसेच गटातटात आंबेडकरी चळवळीतील नेते, कार्यकर्ते यांची झालेली फटाफुट व दलित मतांवर डोळा ठेवून राजकीय पक्षांनी दिलेले महत्त्व हे अधोरेखित होत असताना सामाजिक राजकीय चेहरा म्हणून रत्नाकर मखरे यांची असणारी ओळख फुले, शाहू, आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांची जाणिव जागृतीने कार्यकर्त्यांनी उभारलेल्या चळवळीचा म्होरक्या, पुढारी म्हणून रत्नाकर मखरे राज्यात परिचित होते. राज्यात कुठेही दलितांवर अन्याय, अत्याचार झाला तरी इंदापूर तालुक्यातील रत्नाकर मखरे, एम.बी.मिसाळ व इतर कार्यकर्ते आवाज उठवीत अन्यायाविरुद्ध पडसाद उमटत होते, आंदोलने करत होते .
रत्नाकर मखरे यांच्या पश्चात अँड राहुल मखरे हे रत्नाकर मखरे यांच्या विचारांचे वारसदार म्हणून बहुजन चळवळ राज्यात सक्रिय पणाने चालवित आहेत. मात्र असे असताना अँड. राहुल मखरे यांनी बामसेफ सारख्या केडरबेस असणाऱ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामाजिक संघटनेमध्ये अनेक वर्षे काम केलेले आहे. परंतु, बामसेफ संघटनेच्या राष्ट्रीय सचिवपदी काम करीत असताना संघटनेच्या राष्ट्रीय सचिव पदाचा राजीनामा देवून राजकीय प्रक्रियेत सहभागी होणे साठी अँड. राहूल मखरे हे फुले, शाहू आंबेडकर विचारधारेवर चालणा-या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
त्यांचा पक्षीय प्रवेश दस्तुरखुद्द शरदचंद्र पवार यांच्या हस्ते पुणे येथे घेण्यात आला. अँड.मखरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सचिव पदाची जबाबदारी दिली. अॅड मखरे हे जबाबदारीने काम करत आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकास्तरावरील पदाधिकाऱ्यांनी पक्षीय कार्यपध्दतीमुळे अँड .राहुल मखरे यांना स्टेजवर न बोलविणे, भाषण करण्यास संधी न देणे , चुकून भाषण करण्याची संधी दिलीच तर एक दोन मिनिटांचा वेळ देणे , राजकीय प्रक्रियेत व प्रचार यंत्रणेत महत्त्व न देणे, समावून न घेणे , इंदापूर येथे मार्केट यार्ड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यक्रम असताना अँड मखरे हे खाली लोकांमध्ये बसले होते परंतु दस्तुरखुद्द शरदचंद्र पवार यांनी मखरे यांना बोलावून स्टेजवर घेतले होते.
राजकारणात फुले , शाहू आंबेडकर विचारधारेवर चालणा-या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व याच विचारधारेचे आश्वासक नेतृत्व शरदचंद्र पवार दलितांना आपलेसे वाटतात . परंतु राजकीय पक्षीय तालुकास्तरावर हि फुले शाहू आंबेडकर विचारधारे नुसार कार्यपध्दती राबवली जावी अशी मागणी व्यथीत झालेली आंबेडकरी जनता करत आहे , केवळ मागासवर्गीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी आंबेडकरी नेतृत्वाचा पक्षीय प्रवेश घेतला जात आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित करत दलित बहुजन नेतृत्वाची होणारी हेळसांड थांबवावी व त्यांना तालुकास्तरावर दुय्यम दर्जाची वागणूक देण्या ऐवजी पक्षीय राजकारणात सन्मानाची संधी, समतेची वागणूक मिळावी, अशी अपेक्षा दलित बहुजन मतदार व समाजातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.