लोणी काळभोर, ता.११ : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी अमर शिवाजीराव कुंजीर यांची तर उपाध्यक्षपदी विनोद रामदास सावंत यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मावळते अध्यक्ष रामदास कुंजीर व उपाध्यक्ष सोमनाथ न्हावले आणि अनिकेत कुंजीर यांनी कार्यकाल संपल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (ता.१०) सरपंच अंजू गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी अमर कुंजीर यांची तर उपाध्यक्षपदी विनोद सावंत यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
दरम्यान, अध्यक्षपदी अमर कुंजीर तर उपाध्यक्षपदी विनोद सावंत यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी गुलालाची उधळून करून आनंद व्यक्त केला.
यावेळी माजी सरपंच संतोष कुंजीर, माजी सरपंच सचिन तुपे, श्रीनाथ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप धुमाळ, श्रीराम कुंजीरवाडी सोसायटीचे अध्यक्ष विश्वनाथ गाढवे, माजी उपसरपंच चंद्रकांत मेमाणे, अजय कुंजीर, ग्रामसेविका सविता भुजबळ, पोलीस पाटील मिलिंद कुंजीर, माजी पोलीस पाटील महेंद्र कुंजीर, दत्ता कुंजीर, शिवाजी कुंजीर, गोरख घुले, सुरेश कुंजीर, रामदास कुंजीर, भाऊसाहेब कुंजीर आदी उपस्थित होते.
गट-तट न पाहता तंटा सोडवणार
याबाबत बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष अमर कुंजीर म्हणाले की, या पदाच्या माध्यामातून गावातील कोणताही गट-तट न पाहता तंटा सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच भांडणे सोडवत असताना गावकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन अमर कुंजीर यांनी केले.