Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भिगवणमध्ये लॉज-हॉटेलच्या आड ‘कथित’ देहविक्रीचा बाजार? रात्रीची वर्दळ वाढली; पोलिसांच्या भूमिकेवर सवाल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 25 August 2026, 12:07

सागर जगदाळे

भिगवण: भिगवण, मदनवाडी आणि पुणे–सोलापूर महामार्गालगतच्या परिसरात काही लॉज, हॉटेल तसेच निर्जन ठिकाणी रात्रीच्या वेळी वाढलेली वर्दळ आणि सुरू असलेल्या कथित अवैध धंद्यांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विशेषतः काही लॉज-हॉटेलमध्ये कथित देहविक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली असून, या प्रकारांकडे कोणाचे अभय आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

लॉज-हॉटेलच्या आड कथित देहविक्रीचा बाजार

पुणे–सोलापूर महामार्गालगत काही लॉज व हॉटेलमध्ये रात्रीच्या वेळी वाढणारी बाहेरील व्यक्तींची वर्दळ, वारंवार होणारी ये-जा आणि संशयास्पद हालचाली यामुळे कथित देहविक्रीचा व्यवसाय तेजीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या लॉज-हॉटेलच्या आड नेमके काय सुरू आहे, हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

निर्जन भागांमध्येही वाढली वर्दळ

महामार्गालगत काटेरी झुडपांनी वेढलेल्या काही निर्जन ठिकाणीही रात्रीच्या वेळी वर्दळ वाढल्याची चर्चा आहे. अंधाराचा फायदा घेत अशा ठिकाणांचा कथित अवैध धंद्यांसाठी वापर होत असल्याचे बोलले जात असून, यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

सोशल मीडियावरील व्हिडिओंनी चर्चेला उधाण

भिगवण व परिसरातील काही लॉज-हॉटेल तसेच संबंधित ठिकाणांशी निगडित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध होत असल्याने या कथित अवैध धंद्यांच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे. सोशल मीडियावरील व्हिडिओंमुळे या प्रकाराची चर्चा आता परिसराच्या बाहेरही होत असल्याचे चित्र आहे.

भिगवण पोलिसांच्या कामगिरीवर संशय

या संपूर्ण प्रकारात भिगवण पोलिसांच्या कामगिरीवरही संशय व्यक्त केला जात आहे. बाहेरील यंत्रणा येऊन संबंधित ठिकाणी कारवाई करते; मात्र स्थानिक भिगवण पोलीस प्रशासनाला या प्रकारांची माहिती का मिळत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे, बाहेरील यंत्रणेकडून कारवाई झाल्यानंतर काही काळातच संबंधित ठिकाणी पुन्हा त्याच प्रकारची वर्दळ आणि कथित व्यवसाय सुरू होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कारवाईनंतरही हे कथित अवैध धंदे पुन्हा त्याच जोमाने सुरू होत असतील, तर त्यामागे नेमका कोणाचा आधार आहे? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

अवैध धंदे सुरू राहण्यामागे कोणते आर्थिक हितसंबंध जोपासले जात आहेत का? काहींच्या आर्थिक हितसंबंधांसाठी अशा व्यवसायांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का? अशा व्यवसायांना अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन मिळण्यामागे नेमके कोणते हितसंबंध आहेत? असे प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहेत.

बाहेरील यंत्रणेला माहिती मिळते, कारवाई होते; मात्र स्थानिक पोलिसांना माहिती मिळत नाही, अशी परिस्थिती असेल तर या संपूर्ण यंत्रणेमागे नेमके कोण आहे आणि कोणाच्या पाठबळावर हे कथित व्यवसाय सुरू आहेत? हा प्रश्न अधिक गंभीर बनतो.

‘अवैध धंदे तेजीत’ अशी नागरिकांमध्ये चर्चा

लॉज-हॉटेल, महामार्गालगतचे निर्जन भाग आणि रात्रीची वाढती वर्दळ यामुळे परिसरात ‘अवैध धंदे तेजीत’ अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. कथित देहविक्रीसह अन्य गैरप्रकारांना कोणाचे पाठबळ मिळत आहे, कारवाईनंतरही हे प्रकार पुन्हा कसे सुरू होतात आणि या साखळीमागे नेमके कोण आहे, याची चर्चा आता नागरिकांमध्ये रंगली आहे.

भिगवण, मदनवाडी आणि पुणे–सोलापूर महामार्गालगतच्या परिसरातील रात्रीची वाढती वर्दळ, लॉज-हॉटेलबाबतच्या चर्चा आणि सोशल मीडियावरील व्हिडिओ यामुळे निर्माण झालेला संशय आता अधिकृत तपासातून दूर होण्याची गरज आहे. कथित देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याच्या चर्चांमागील वस्तुस्थिती पोलिस तपासातून समोर येणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तीन वर्षांनी वळसे पाटलांचा मोठा गौप्यस्फोट! शरद पवारांची साथ सोडण्यामागे नेमकं काय होतं कारण? अखेर सांगितलं

Wednesday, 9 September 2026, 10:06

गणपती उत्सवाआधी पुण्यात प्रशासन अॅक्शन मोडमध्ये! DJ, सुरक्षा अन् मिरवणुकीसाठी विशेष तयारी सुरु

Wednesday, 9 September 2026, 9:58

मुस्लिमांनी गरब्यात यायचं असेल तर हिंदू व्हा? नितेश राणेंच्या विधानानं राजकीय वातावरण तापलं

Wednesday, 9 September 2026, 9:14

पुण्यात गणेशोत्सवात दारू बंद! 10 दिवस ड्राय झोन, ‘या’ तारखांना कडक निर्बंध

Wednesday, 9 September 2026, 8:58

शांततेच्या चर्चांना ब्रेक? अमेरिकेने इराणचे 5 तेल टँकर केले लक्ष्य, तणाव शिगेला

Wednesday, 9 September 2026, 8:47

पुणे जिल्ह्यात महाकुंभ रोजगार मेळावा; युवक-युवतींना नोकरीची मोठी संधी

Wednesday, 9 September 2026, 8:41
Next Post

“तू ये, तुझा खेळच संपवून टाकतो!” अभिजीत दिपके यांना थेट धमकी; प्रकरणाने उडवली खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp