Tuesday, May 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Alandi Scam : आळंदीतील ‘अमृतानुभव’ पतसंस्थेत 11 कोटींचा महाघोटाळा; सोनं गहाण न ठेवता कोट्यवधी लुटले; सामान्यांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 24 January 2026, 21:18
Alandi Scam: A huge scam of 11 crores in 'Amrutanubhav' credit institution in Alandi; Crores looted without pledging gold; Common man's hard earned money looted

आळंदी: तीर्थक्षेत्र आळंदीत सहकार (Alandi Scam) चळवळीच्या विश्वासालाच तडा देणारा मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. आळंदीतील चावडी चौक (Pune Scam News) परिसरात असलेल्या अमृतानुभव नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल 11 कोटी 3 लाख 13 हजार 380 रुपये रकमेचा अपहार झाल्याचे समोर आले असून, या प्रकरणाने संपूर्ण सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. भाविकांची आणि स्थानिक नागरिकांची आर्थिक उलाढाल ज्या संस्थांवर अवलंबून आहे, त्याच संस्थांमधून असा गैरप्रकार घडल्याने ठेवीदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. (Latest Marathi News)

 

पोलिस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, पतसंस्थेचे तत्कालीन व्यवस्थापक बाळू अर्जुन पवार याने आपल्या पदाचा गैरवापर करत संस्थेतील सोनार पूर्णानंद खोलम आणि ऑडिटर संजय लांडगे यांच्याशी संगनमत केले. या तिघांनी मिळून कागदोपत्री सोनेतारण कर्जाचा बनाव उभा केला. प्रत्यक्षात कोणतेही सोने गहाण न ठेवता, किंवा बनावट तपासणी अहवाल तयार करून, बोगस कर्जदारांच्या नावावर कोट्यवधी रुपयांची कर्जे मंजूर झाल्याचे दाखवण्यात आले. ही संपूर्ण रक्कम संस्थेच्या खात्यातून परस्पर काढून घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. सोन्याची तपासणी आणि कर्ज मंजुरीबाबत खोटे अहवाल सादर करून संचालक मंडळाची दिशाभूल करण्यात आल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.

पतसंस्थेचे अध्यक्ष संजय जयसिंग शिर्के यांनी दिलेल्या तक्रारीनंतर आळंदी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. हा अपहार 24 नोव्हेंबर 2025 पूर्वीच्या कालावधीत झाल्याचे सांगितले जात असून 23 जानेवारी रोजी उशिरा तक्रार नोंदवण्यात आली. या प्रकरणात ऑडिटर संजय लांडगे आणि सोनार पूर्णानंद खोलम यांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी बाळू पवार फरार आहे.

गेल्या काही वर्षांत राज्यभरातील नागरी सहकारी पतसंस्थांमध्ये अशा प्रकारचे घोटाळे सातत्याने समोर येत आहेत. बनावट सोनेतारण, बोगस कर्जवाटप आणि अंतर्गत संगनमत यामुळे सामान्य कष्टकरी, शेतकरी आणि पेन्शनधारकांची आयुष्यभराची पुंजी धोक्यात येत आहे. बँकांच्या तुलनेत पतसंस्थांमधील ठेवींना असलेले विमा संरक्षण अत्यल्प असल्याने, अशा संस्था अडचणीत आल्यास ठेवीदार अक्षरशः उघडे पडतात. आळंदीतील हा घोटाळा केवळ एका पतसंस्थेचा प्रश्न नसून, सहकार व्यवस्थेतील देखरेख, ऑडिट आणि जबाबदारी यंत्रणेचे अपयश पुन्हा एकदा अधोरेखित करणारा गंभीर इशारा आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Accident

Loni Kalbhor News : सोलापूर-पुणे महामार्गावर हिट-अँड-रनची धक्कादायक घटना! कामावरून घरी जाताना कामगाराला भरधाव कारची धडक; चालक फरार

Tuesday, 5 May 2026, 17:48

Good News : मोबाईल हरवला… पण 20 मिनिटांत परत! चंदननगर पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेचा आनंद गगनात

Tuesday, 5 May 2026, 17:35
Loni Kalbhor News: Biker dies in accident at Loni Kalbhor

Theur News : थेऊर येथे पेट्रोल टँकरची कारला जोरदार धडक; महिला व चिमुकला गंभीर जखमी

Tuesday, 5 May 2026, 17:25

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये अवैध दारूचा मोठा पर्दाफाश; आई–मुलासह तिघांवर गुन्हा, ३५० लिटर हातभट्टी दारू नष्ट!

Tuesday, 5 May 2026, 17:11

Indapur News : इंदापूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत दोन घरफोड्या, १० लाखांचा ऐवज लंपास!

Tuesday, 5 May 2026, 16:54

Ganpati News : अंगारकीला भाविकांची उसळलेली गर्दी; रांजणगाव महागणपती मंदिर मात्र ३१ जुलैपर्यंत बंद!

Tuesday, 5 May 2026, 16:50
Next Post
Imtiaz Jaleel: "If Thane is saffron, why not Mumbra green?" Imtiaz Jaleel's attack on the Mahayuti; 'If a parrot comes to Mumbra...' 'That' controversial statement is in the news

Imtiaz Jaleel: "ठाणे भगवा तर मुंब्रा हिरवा का नको?" इम्तियाज जलील यांचा महायुतीवर हल्लाबोल; 'तोतला मुंब्र्यात आला तर...' 'ते' वादग्रस्त विधान चर्चेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.