लोणी काळभोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमाच्या माध्यमातून नेहमी जनतेची संपर्क साधत असतात. व भारताच्या सर्वांगीण विकासासाठी निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या तरुणांचे कौतुक करतात. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोपालगंज (बिहार) येथे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत उभारण्यात आलेल्या प्रयोग ग्रंथालयाचे कौतुक केले आहे. तर हा प्रकल्प उभारण्यासाठी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील कन्या सिद्धी राजेश काळभोर हिने महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे सिद्धी काळभोरचे लोणी काळभोरसह जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांला सर्वात जवळचा मित्र म्हणजे पुस्तक होय.विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यासाठी पुस्तके अतंत्य महत्वाची भूमिका बजावीत आहेत. त्यामुळे गोरगरीब तरून व विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाचण्यासाठी मिळावेत. यासाठी गोपालगंज (बिहार) येथे इंडिया फेलो संस्थेच्या माध्यमातून गरीब मुलांसाठी गंथालय उभारण्यात आले आहे. या ग्रंथालयाला प्रयोग ग्रंथालय अये नाव देण्यात आले असून हे गंथालय पुस्तके वाचण्यासाठी निशुल्क स्वरुपात खुले करण्यात आले आहे. या ठिकाणी परिसरातील १२ गावातील तरुण पुस्तके वाचण्यासाठी येत आहेत. याची पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी दखल घेऊन कौतुक केले आहे.
‘मन की बात’ या आकाशवाणी मधील कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतीय नागरिक जगात वेगवेगळ्या ठिकाणी राहायला आहेत. त्यांनी आपली संस्कृती जपून ठेवली आहे. आपल्या कामाच्या माध्यामातून नवीन ओळख निर्माण केली आहे. अनेक तरुण देशाच्या सर्वांगीण पुढे आले आहेत. काही युवकांनी डिजिटल जीवन प्रमाणपत्र काढून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तर काही युवक जेष्ठ नागरिकांना डिजिटल पेमेंट कसे करणे याची माहिती देत आहेत. त्याचबरोबर सायबर चोरी कशी रोखावी याचीही नागरिकांना माहिती समजावून सांगत आहेत. अनेक विद्यार्थी टाकाऊ पदार्थापासून पासून टिकाऊ वस्तू तयार करीत आहेत. काही ठिकाणी तरुण नद्या व परिसर स्वच्छ करीत आहेत. त्यामुळे भारताच्या स्वच्छता अभियानाला गती मिळणार आहे. भारत एक स्वच्छ व सुंदर देश लवकर बनेल.
आपल्या लोकवस्तीमध्ये सतत वावर असलेला पक्षी म्हणजे चिमणी होय. नैसर्गिक चक्र सुरळीत चालू ठेवण्यासाठी ती एक पर्यावरणाचा महत्वाचा घटक आहे. परंतु, हा पक्षी शहरातून लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. शहरीकरणामुळे चिमणी ग्रामीण भागात निघून गेले आहे. त्यामुळे अनेक मुलांनी केवळ तिला चित्रातच पहिले असेल. तिला पुन्हा आणण्यासाठी ट्रस्ट व पर्यावरण प्रेमींचे अनेक प्रयत्न सुरु केले आहे. चिमणीसाठी घरटे बनविण्याचे काम विद्यार्थी करीत आहेत. त्यामुळे आपल्याला पुन्हा शहरातही चिमणी लवकर दिसेल.
राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा दल या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण येतात. त्यामुळे ते नागरिकांची सेवा करण्यासाठी नेहमी सक्षम तत्पर असतात. अनेक तरुण आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांची मदत करीत आहे. देशांत सध्या २० लाख विद्यार्थी एनसीसीमध्ये सहभागी झालेले आहेत. या मध्ये मुलींनीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या असून त्यांचा ४० टक्क्याहून अधिक सहभाग असल्याचे दिसून येत आहे. भारत विकसित बनविण्यासाठी तरुणांचा खूप मोठा वाटा असणार आहे. यामध्ये अनेक युवकांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
एक पेड मा के नाम या मोहिमेंतर्गत 100 कोटी वृक्ष लावण्यात आले आहे. आणि हे केवळ ६ मानिण्याच्या आत करण्यात आले आहे. हा एक रेकोर्ड झाल आहे. आणि आता जगात इतर ठिकाणही हा उपक्रम लावण्यात येत आहेत. कोणीही व्यक्ती या उपक्रमात समाविष्ठ होऊन झाले लावू शकतो. अशा प्रशंसनीय घटना तुम्ही नमो app, mygov किंवा #indianDiasporaStories वर शेअर करा. असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
दरम्यान, ऑक्टोबर 2014 रोजी प्रथम प्रसारित झालेला, मन की बात हा एक भारतीय रेडिओ कार्यक्रम आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय महत्त्वाशी संबंधित विविध समस्या आणि कल्पनांवर नागरिकांना संबोधित करतात. भारतात टेलिव्हिजन अद्याप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नसल्यामुळे, विशेषत: एकाकी ग्रामीण भागात, ऑल इंडिया रेडिओ हे लोकसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी अधिकृत माध्यम म्हणून निवडले गेले आहे.