पळसदेव (पुणे ): महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेत भिगवण ता इंदापूर येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाचा निकाल १००% लागल्याची माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुचिता साळुंके यांनी दिली आहे .

शासकीय चित्रकला इंटरमिजिएट परीक्षेत प्रविष्ठ ३६ विद्यार्थ्यांपैकी अ श्रेणी मध्ये ०२ ब श्रेणी मध्ये १४ तर क श्रेणी मध्ये २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एलिमेंटरी शासकीय चित्रकला स्पर्धेचा निकाल १००% इतका लागला असून एकूण प्रविष्ठ ३५ विद्यार्थ्यांपैकी अ श्रेणी मध्ये ०१ ब श्रेणी मध्ये ०८ तर क श्रेणी मध्ये २६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयातील कलाशिक्षिका सौ सुनिता पोटफोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
चित्रकला परीक्षेतील सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक यांचे श्री साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ चंद्रकांत खानावरे , विद्यमान अध्यक्ष डॉ अमोल खानावरे ,सचिव डॉ अमित खानावरे ,संस्थेचे सर्व संचालक मंडळ ,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुचिता साळुंके यांनी अभिनंदन केले आहे.







