रांजणगाव गणपती : रांजणगाव गणपती या औद्योगिक एमआयडीसी तील राजमुद्रा चौकात (MIDC Rajamudra Chowk)हा अपघात झाला आहे. ही दोन्हीही वाहने एकापाठोपाठ नगरच्या दिशेने जात असताना समोर चाललेली एसटी बस थांबल्यामुळे एसटी बसच्या पाठोपाठ येणाऱ्या टाटा अल्टरोज च्या कार चालकाला कार कंट्रोल न झाल्याने हा अपघात (Accident) झाला आहे.
या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही. दरम्यान राजमुद्रा चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. काही वेळाने नागरिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.