योगेश शेंडगे
रांजणगाव : रांजणगाव एमआयडीसी येथील जेबील कंपनीत कामाला असलेल्या महिलेला कंपनीतील असीस्टंट मॅनेजर नितीन कुलकर्णी वारंवार फोन करुन तसेच महिलेला भेटून जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. त्यांनंतर त्याने महिलेला भेटून महिलेच्या मनास लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले.
याबाबत पीडित महिलेने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी जेबील कंपनीचे असीस्टंट मॅनेजर नितीन कुलकर्णी (रा. शिरुर ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तेजस रासकर हे करत आहे.