अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : गुणाट (ता. शिरूर) पूर्वीच्या भाडनाच्या कारणावरून महिलेस दोघांनी शिवीगाळ दमदाटी करत लोखंडी गज व लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले आहे. याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन येथे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंजु श्रीसुरक्षा पवार (वय 34 वर्ष, रा. गुणाट, कोळपेवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत राजेंद्र सुरकुल पवार, शाम राजेंद्र पवार (दोन्ही रा. गुणाट, कोळपेवाडी ता. शिरुर जि. पुणे) याच्य विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पुढील दिनांक 14 सप्टेंबर रोजी सकाळी 08.30 वाजण्याच्या सुमारास गुणाट येथे फिर्यादीच्या घरासमोर त्यांचा दिर राजेंद्र सुरकुल पवार व त्याचा मुलगा शाम राजेंद्र पवार असे आले व त्यांनी फिर्यादी महिलेस पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन तसेच आरोपीने फिर्यादीस आमचे खेळण्याच्या साहित्याचे नुकसान तुझ्यामुळे झाले आहे.
त्याची भरपाई दे असे म्हणून राजेंद्र सुरकुल पवार याने त्याच्या हातातील लोखंडी गजाने फिर्यादीच्या उजव्या हातावर मारुन हातास गंभीर दुखापत करुन पायावर, दंडावर मारले. शाम राजेंद्र पवार याने लाकडी काठीने फिर्यादीला मारहाण केली व शिवीगाळ दमदाटी करुन निघुन गेले. महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोरे हे करत आहेत.