बापू मुळीक
पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामधील थापेवाडी गावात एकाने घरात पत्र्याच्या अँगलला साडी बांधून गळफास घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत बालासो कालुराम खवले (रा. थापेवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. अभंग हरीभाऊ कांबळे (वय 33 वर्षे मुळ रा. ब्रम्हांण्डपुरी सध्या रा. थापेवाडी ता. पुरंदर जि. पुणे) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बालासो कालुराम खवले यांनी फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की, मी रा. थापेवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे या ठिकाणी माझे कुटुंबासह राहायला आहे. शेती करुन माझ्या घराची उपजिवीका करतो, शेती करण्याकरीता माझ्याकडे ट्रैक्टर आहे. ट्रॅक्टरवर चालक म्हणुन अभंग हरीभाऊ कांबळे हे गेले 8 महिन्यांपासून काम करतो व तो कुंटुंबासह आमच्या घरा शेजारीच राहतो. आज रोजी सकाळी 7 वाजता अभंग यास उठविण्यासाठी त्यांच्या घराचे दार वाजवले परंतु त्याचा काही प्रतिसाद आला नाही. म्हणुन आम्ही खिडकीतुन पाहीले तेव्हा आम्हास घरावरील पत्र्याच्या अँगलला साडीने गळफास घेतलेला दिसून आला. असे फिर्यादीत म्हटले आहे.
त्यानंतर खवले यांनी गावचे पोलीस पाटील यांना फोन करुन सदरची हकीकत सांगितली. त्यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे फोन करुन याबाबत माहीती दिली. सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस तेथे तात्काळ येऊन त्यांनी त्यास ग्रामीण रुग्णालय सासवड येथे दवाखाण्यात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासुन तो मयत झाल्याचे सांगीतले. पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे निरीक्षक ऋषीकेश अधिकारी करीत आहेत.