Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हवेलीतील PDCCच्या लढतीत रंगणार तिरंगी सामना? प्रकाश मस्के, विकास दांगट की दिलीप काळभोर; उत्सुकता वाढली

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 30 September 2026, 12:49

हवेली, ता. 30 : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) आगामी निवडणुकीमुळे हवेली तालुक्यातील सहकाराचे राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हवेलीच्या जागेसाठी भाजपकडून विकास दांगट, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडून दिलीप काळभोर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाकडून प्रकाश मस्के यांच्या नावांची चर्चा असल्याने तालुक्यात तिरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत.

पीडीसीसीच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्याने सहकारी संस्थांचे ठराव, मतदार संस्थांचे गणित आणि स्थानिक नेत्यांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे हवेलीमध्ये उमेदवारीइतकाच कोणत्या उमेदवाराच्या मागे कोणते सहकाराचे गट आणि संस्थात्मक ताकद उभी राहते, हा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे.

मागील मैत्रीपूर्ण लढत; यंदा समीकरणे बदलली

मागील निवडणुकीत प्रकाश मस्के विरुद्ध विकास दांगट अशी मैत्रीपूर्ण लढत झाली होती. त्या वेळी दांगट यांच्या बाजूने प्रकाश जगताप, प्रशांत काळभोर तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप काळभोर यांनी पाठिंबा दिल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळात सांगितले जाते. मात्र, त्यानंतरच्या काळात राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला आहे. विकास दांगट यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ते भाजपच्या माध्यमातून पीडीसीसीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दुसरीकडे प्रकाश मस्के राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाकडून इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मागील निवडणुकीतील मैत्रीपूर्ण वातावरण यंदा पक्षीय आणि संस्थात्मक संघर्षात बदलण्याची शक्यता आहे.

 

दिलीप काळभोरांची स्वतंत्र ताकद चर्चेत

हवेलीतील पीडीसीसीच्या लढतीत दिलीप काळभोर यांची संभाव्य उमेदवारी विशेष महत्त्वाची मानली जात आहे. ते पीडीसीसी बँकेचे माजी अध्यक्ष अशोक काळभोर यांचे धाकटे बंधू असून, त्यांनी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे दोन वेळा सभापतीपद भूषविले आहे. त्यामुळे सहकार आणि कृषी क्षेत्रात त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. काळभोर यांच्याकडे मोठ्या संख्येने सहकारी संस्थांचे पाठबळ असल्याची चर्चा सहकार क्षेत्रात आहे. त्यामुळे ते केवळ पक्षाच्या राजकीय ताकदीवर नव्हे, तर स्वतःच्या संस्थात्मक आणि सहकारातील गटाच्या जोरावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

काळभोर कुटुंबाचा हवेलीच्या सहकार क्षेत्रातील प्रभाव आणि दिलीप काळभोर यांचा वैयक्तिक राजकीय-सहकारी संपर्क लक्षात घेता, त्यांची संभाव्य उमेदवारी निवडणुकीचे गणित बदलणारी ठरू शकते. मोठ्या संख्येने संस्था आणि मतदार संस्थांशी असलेला संपर्क त्यांच्या उमेदवारीचा महत्त्वाचा आधार ठरू शकतो, अशी चर्चा आहे. त्यामुळे हवेलीत मस्के, दांगट आणि काळभोर अशी तिरंगी लढत प्रत्यक्षात आल्यास मागील निवडणुकीपेक्षा यंदाचे राजकीय गणित पूर्णपणे वेगळे राहण्याची शक्यता आहे. उमेदवारांची वैयक्तिक ताकद, संस्थात्मक पाठिंबा, सहकारी संस्थांचे ठराव आणि स्थानिक राजकीय नेत्यांची भूमिका यामुळे ही लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

जगताप बंधूंची भूमिका ठरणार महत्त्वाची

हवेलीच्या सहकाराच्या राजकारणात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप आणि यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप या बंधूंची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. याशिवाय बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांचा पाठिंबा कोणत्या उमेदवाराला मिळतो, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मागील निवडणुकीत दांगट यांच्या बाजूने उभे राहिलेले काही नेते यंदा कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः प्रकाश जगताप, सुभाष जगताप आणि प्रशांत काळभोर यांच्या भूमिकेमुळे मतदार संस्थांच्या राजकीय गणितावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजप विरुद्ध राष्ट्रवादीचे दोन्ही गट?

दांगट भाजपकडून, दिलीप काळभोर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडून आणि प्रकाश मस्के राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाकडून मैदानात उतरल्यास हवेलीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादीचे दोन्ही गट असा सामना रंगण्याची शक्यता आहे. मात्र, ही निवडणूक केवळ पक्षीय चिन्हांवर लढली जाणार नाही, तर सहकारातील जुने संबंध, वैयक्तिक संपर्क, संस्थांचे ठराव, स्थानिक गट आणि नेत्यांचे पाठबळ यांचा मोठा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे कोणत्या उमेदवारामागे किती संस्थात्मक ताकद उभी राहते, यावर हवेलीच्या निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे.

दरम्यान, हवेलीच्या सहकाराच्या राजकारणात पीडीसीसी निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मोठी राजकीय जुळवाजुळव सुरू झाली आहे. मस्के यांचे पारंपरिक समीकरण, दांगट यांचा भाजप प्रवेश आणि दिलीप काळभोरांची स्वतंत्र सहकारातील ताकद यामुळे यंदाची लढत मागील निवडणुकीपेक्षा वेगळी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवेलीचा सहकाराचा कौल कोणत्या राजकीय समीकरणाला बळ देतो, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांची वाहतूक कोंडी सुटणार! बहुप्रतिक्षित HCMTR प्रकल्पाचे काम अखेर ४ टप्प्यांत मार्गी लागणार

Wednesday, 30 September 2026, 17:10

सोरतापवाडीत चारचाकी गाडी अडवून तरुणाला मारहाण ; काचा फोडून चावीही नेली, उरुळी कांचन पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल..

Wednesday, 30 September 2026, 16:39

१ ऑक्टोबरपासून देशात होणार मोठे बदल! एलपीजी सिलिंडर, एटीएम चार्जेस अन् जन्म-मृत्यू नोंदणीच्या नियमांत बदल; जाणून घ्या सर्व अपडेट्स

Wednesday, 30 September 2026, 16:32

आलेगावच्या मुरूम उत्खननाचा ‘खरा हिशोब’ किती ? पर्यावरणप्रेमींचा सवाल; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी आणि फेरपंचनाम्याची मागणी

Wednesday, 30 September 2026, 16:29

दिवाळीत फटाक्यांवर पुन्हा निर्बंध? सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभराचं लक्ष ‘त्या’ आदेशाकडे!

Wednesday, 30 September 2026, 16:12

जरांगेंचा मोठा यू-टर्न! 2 कोटींची’ डिफेंडर ‘केली परत; ‘या’ कारणामुळे निर्णय घेतल्याची चर्चा

Wednesday, 30 September 2026, 15:42
Next Post

शिरूरच्या पीडीसीसी जागेसाठी राजकीय रणधुमाळी! अशोक पवारांसमोर जासूद की गायकवाड? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत उमेदवारीसाठी रस्सीखेच

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp