Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जरांगेंचा मोठा यू-टर्न! 2 कोटींची’ डिफेंडर ‘केली परत; ‘या’ कारणामुळे निर्णय घेतल्याची चर्चा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 30 September 2026, 15:42

पुणे : मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान वापरण्यात आलेली २ कोटी रुपयांची आलिशान ‘डिफेंडर’ गाडी सध्या राज्यभरात मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सोन्या-चांदीचे व्यापारी आणि मराठा आंदोलक सुभाष भोसले यांनी जरांगे यांचा प्रवास सुखकर व्हावा आणि आरोग्याला त्रास होऊ नये, या उद्देशाने ही गाडी वापरण्यासाठी दिली होती.मात्र ही गाडी जरांगे यांनी आता परत केली आहे.

या गाडीवरून विरोधी आणि ओबीसी नेत्यांनी जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. ‘इतकी महागडी गाडी खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आले?’ असे सवाल उपस्थित करत विरोधकांनी त्यांना लक्ष्य केले. तरीही, दौऱ्यादरम्यान हजारो समर्थकांनी या गाडीसोबत फोटो व सेल्फी काढत आनंद व्यक्त केला होता.

परंतु, छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे पाटील या गाडीने अंतरवाली सराटी आणि नंतर आपल्या अंकुशनगर येथील घरी पोहोचले. तिथे पोहोचताच ही डिफेंडर गाडी मूळ मालक सुभाष भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

गाडी परत करण्यामागे महत्त्वाचे कारण समोर आले आहे. भोसले यांच्या कोलकात्यातील दुकानावर नुकतीच ईडीची कारवाई झाल्याची चर्चा आहे. आपल्यामुळे भोसले यांना अथवा इतर सहकाऱ्यांना शासनाकडून त्रास होऊ नये, म्हणून जरांगेंनी स्वतःहून ही गाडी परत नेण्याचा निरोप पाठवला होता. सरकार आपल्याला घेरण्यासाठी सहकाऱ्यांची चौकशी करत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला होता.

 

दुसरीकडे, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी यावर वेगळा दावा केला आहे. तपास यंत्रणांची चौकशी स्वतःपर्यंत पोहोचेल या भीतीपोटीच जरांगे यांनी गाडी मालकाला परत केली, असा आरोप करत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. आता ही गाडी मूळ मालकाकडे गेल्याने जरांगे यांच्यावरील राजकीय आरोप-प्रत्यारोप शमतील, अशी आशा मराठा समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचे पैसे थेट खात्यावर जमा होणार; फडणवीसांच्या हस्ते वितरण

Thursday, 1 October 2026, 17:21

पूर्णेकर हत्या प्रकरणात ट्विस्ट! ‘ठाण्याची लेडी डॉन’ चर्चेत; राऊतांची Audio Clip व्हायरल, “पोलिसांना अजून काय पुरावे हवेत?”

Thursday, 1 October 2026, 16:45

अचानक दारातला कुत्रा भुंकला, अंगणात बिबट्या उभा आणि घरात वृद्ध आजी-आजोबा! बिबट्याने झडप घातली अन् नातीनं असं काही केलं की….

Thursday, 1 October 2026, 16:21

‘जैन नगरी’ वक्तव्य भोवलं! चौफेर टीकेनंतर भाजप आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा..

Thursday, 1 October 2026, 16:18

‘नराधमाला फाशी झालीच पाहिजे’; इंदापूरात नाभिक समाजाचा अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा

Thursday, 1 October 2026, 16:00

नवरात्रीच्या 9 दिवसांत चेहऱ्याचा ग्लो वाढवायचाय? पार्लरला जाण्याची गरज नाही, किचनमधल्या या 3 गोष्टी ठरतील उपयोगी

Thursday, 1 October 2026, 15:50
Next Post

दिवाळीत फटाक्यांवर पुन्हा निर्बंध? सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभराचं लक्ष ‘त्या’ आदेशाकडे!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp