Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांची वाहतूक कोंडी सुटणार! बहुप्रतिक्षित HCMTR प्रकल्पाचे काम अखेर ४ टप्प्यांत मार्गी लागणार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 30 September 2026, 17:10

पुणे : शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित उच्च क्षमता वर्तुळाकार मार्गाचा (HCMTR) प्रकल्प चार टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. यातील सिंहगड रस्ता ते लुल्लानगर आणि विमाननगर ते बॉम्बे सॅपर्स या पहिल्या दोन टप्प्यांच्या निविदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात काढण्याची तयारी पुणे महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. या दोन्ही टप्प्यांसाठी तुलनेने कमी भूसंपादनाची आवश्यकता असल्याने त्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी याबाबत माहिती दिली. सन १९८७ च्या विकास आराखड्यात HCMTR प्रकल्पाचा समावेश करण्यात आला होता. पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. प्रस्तावित उन्नत मार्गाची लांबी सुमारे ३६ किलोमीटर असून रुंदी २४ मीटर असणार आहे. या मार्गावर ३४ प्रमुख चौक आणि वाहनांच्या प्रवेश-निर्गमनासाठी ३३ रॅम्प प्रस्तावित आहेत.

प्रकल्पाच्या आराखड्यानुसार सुमारे २१.८ किलोमीटरचा मार्ग विद्यमान रस्त्यांवरून जाणार आहे. तर सुमारे ४.२८ किलोमीटरचा भाग नाले, नदी आणि कालव्यालगतून जाणार आहे. त्याचबरोबर ४.३४ किलोमीटरचा मार्ग वनक्षेत्र आणि रेल्वे परिसरातून जाण्याचे नियोजन आहे. काही भाग बांधकामे आणि झोपडपट्टी परिसरातूनही जाणार असल्याने या ठिकाणी भूसंपादनाची आवश्यकता भासणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी HCMTR प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश दिल्यानंतर मंगळवारी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या दालनात यासंदर्भात बैठक घेण्यात आली. बैठकीला महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच सभागृह नेते गणेश बीडकर उपस्थित होते.

 

प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या जमिनींसोबतच काही खासगी जमिनींचेही संपादन करावे लागणार आहे. मात्र, प्रकल्पाचा मोठा भाग विद्यमान २४ मीटर रुंदीच्या रस्त्यांवरून जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. HCMTRचे काम पुढील तीन वर्षांत मार्गी लावण्याचा प्रयत्न असून, आवश्यक भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून विशेष सहकार्य मिळेल, असे गणेश बीडकर यांनी सांगितले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

फक्त हॉर्न वाजवल्याचा राग अन् ST बसचालकाला मारहाण; पुणे-मुंबई महामार्गावरील घटना

Saturday, 3 October 2026, 8:58

“परदेशी व्यापारात गुंतवणूक करा, 22% परतावा मिळणार” म्हणाले अन् फसवणूक; पैसे मागताच जीवे मारण्याची धमकी? बारामती येथील धक्कादायक प्रकार

Saturday, 3 October 2026, 8:50

5 हजारांसाठी बँक खातं दिलं अन् पुढे 1.80 कोटींचा फ्रॉड; पुण्यातून सुरु होता Online Scam? 19 नागरिकांना घातला गंडा

Saturday, 3 October 2026, 8:36

Maharashtra Weather: पावसाला ब्रेक, आता उकाड्याची चाहूल! महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; आजचा अंदाज काय?

Saturday, 3 October 2026, 8:20

तरुणीला 2 तरुणांसोबत पाहिलं, पूर्णेकरांनी केला हस्तक्षेप अन् काही दिवसांनी हत्या; मुलाच्या दाव्याने खळबळ

Saturday, 3 October 2026, 8:18

IND vs PAK: सुवर्णपदकासाठी भारत-पाकिस्तान भिडणार; आज क्रिकेटच्या मैदानात पुन्हा महामुकाबला

Saturday, 3 October 2026, 7:49
Next Post

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत नाट्यमय घडामोडी! निवडणुकीत तिरंगी सामना; जगतापांच्या बंडाने समीकरणे बदलली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp