Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील एमआयटी गेटसमोर भरधाव होंडा सिटी अंडरपासच्या कठड्यावर धडकली! कारचा चक्काचूर, चालकाने कार तिथेच सोडून ठोकली धूम

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 14 August 2026, 11:49

लोणी काळभोर, ता. १४ : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील रेल्वे उड्डाणपुलाखाली भरधाव वेगातील होंडा सिटी कार सिमेंटच्या कठड्याला जोरदार धडकून अपघात झाल्याची घटना घडली आहे. हि घटना एमआयटी कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गुरुवारी (ता. १३) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अपघातानंतर कारचालकाने पोलिसांना अथवा संबंधित विभागाला कोणतीही माहिती न देता अपघातग्रस्त कार घटनास्थळीच सोडून पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार महेंद्र भगवानराव आगळे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार या अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र आगळे हे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असून सध्या बीट मार्शल म्हणून कर्तव्य बजावत आहेत. १३ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत ते पोलीस शिपाई बोरावके यांच्यासोबत लोणी स्टेशन पोलीस चौकीच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. गुरुवारी सायंकाळी एमआयटी कॉलेज, लोणी काळभोरचे सुरक्षा इन्चार्ज तात्यासाहेब पवार यांनी पोलिसांना फोन करून एका वाहनाचा अपघात झाला असून पोलीस मदतीची गरज असल्याची माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच, बीट मार्शल महेंद्र आगळे व पोलीस अंमलदार बोरावके हे तातडीने एमआयटीच्या मुख्य गेटसमोर पोहोचले. तेथे सुरक्षा इन्चार्ज तात्यासाहेब पवार उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे ७.१५ वाजता होंडा सिटी कार क्रमांक एमएच १२ एमएल ५११४ ही चिंतामणी पार्ककडून लोणी स्टेशनच्या दिशेने अंडरपासमधून जात होती. कारमध्ये चालकासह आणखी दोन ते तीन व्यक्ती असल्याची माहिती देण्यात आली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Puneprimenews (@pune_primenews)

चालकाने वाहतूक नियमांकडे तसेच रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अत्यंत भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविले. त्यामुळे एमआयटी मुख्य गेटसमोरील अंडरपासजवळ कारने सिमेंटच्या कटड्याला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, अपघातानंतर चालक आणि कारमधील अन्य व्यक्ती घटनास्थळावरून निघून गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे, अपघाताची कोणतीही माहिती पोलिसांना किंवा संबंधित विभागाला न देता अपघातग्रस्त कार घटनास्थळीच सोडून देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता होंडा सिटी कार कटड्याला धडकलेल्या अवस्थेत आढळून आली. एमआयटीच्या इतर सुरक्षा रक्षकांकडे चौकशी केली असता त्यांनीही सुरक्षा इन्चार्जने दिलेल्या माहितीलाच दुजोरा दिला. दरम्यान, पोलिसांनी परिसरात चालकाचा शोध घेतला; मात्र तो किंवा कारमधील अन्य व्यक्ती आढळून आले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी बालाजी क्रेन सर्व्हिसेस, लोणी काळभोर यांच्या क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त कार पोलीस ठाण्यालगतच्या मोकळ्या जागेत आणून सुरक्षितपणे पार्क केली.

चालकाचा शोध सुरू

भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरणे तसेच अपघाताची माहिती न देता वाहन घटनास्थळी सोडून जाणे, या प्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. कारमध्ये नेमके कोण होते आणि अपघातानंतर चालक व अन्य व्यक्ती घटनास्थळावरून का पसार झाले, याचा तपास पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

गर्लफ्रेंडशी बोलल्याचा राग अनावर अन् तरुणाचे अपहरण ; पोलिसांचा थरारक पाठलाग

Thursday, 10 September 2026, 14:10

ठाण्यात शिंदेसेनेला मोठा धक्का ! सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवकपद रद्द; नेमकं काय घडलं?

Thursday, 10 September 2026, 13:18

गुटखा बंदीला चकवा देत ‘रसद’ कोण पुरवते?भिगवण-मदनवाडी परिसरात तपासाची मागणी

Thursday, 10 September 2026, 12:31

पुण्यात दिवसाढवळ्या थरार! सोसायटीच्या गेटवर नागरिकाला घेरलं अन् 2.60 लाख लंपास

Thursday, 10 September 2026, 12:30

iPhone 18 मध्ये भन्नाट फीचर्स! 48MP कॅमेरा, A20 Pro चिप अन् प्रीमियम क्वालिटीची अनेकांना भुरळ

Thursday, 10 September 2026, 12:14

अभिजीत दिपकेंचा मोठा निर्णय! प्रथमेश देशमुखांच्या कुटुंबाला भेटणार, MPSC प्रकरणात सरकारविरोधात नवा डाव?

Thursday, 10 September 2026, 11:48
Next Post

मांडीवर बसवलं, कानात मंत्र सांगितला अन्... पुण्यातील गुरुवर्यने अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp