Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 पुणे-सोलापूर महामार्गावरील एका नामांकित डॉक्टरांचे अपहरण करून उकळली 19 लाखांची खंडणी; पाच जणांवर गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 16 January 2026, 10:19

उरुळी कांचन, (पुणे): पूर्व हवेलीतील एका नामांकित डॉक्टरांचे अपहरण करून जीवे ठार मारण्याची धमकी देत तब्बल 19 लाख रुपयांची खंडणी उकळल्याची गंभीर व धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाच अनोळखी इसमांविरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हि घटना शनिवारी (ता. 10) ते सोमवारी (ता. 12) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास प्रयागधाम फाट्याच्या पुढे इनामदारवस्ती परिसरात घडली आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टरांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉक्टर यांचे पुणे-सोलापूर महामार्गावरील एका गावात स्वतःचे रुग्णालय आहे. शनिवारी रात्री सव्वा दहा ते साडे दहा वाजता त्यांच्या चारचाकी गाडीने प्रवासासाठी निघाले होते. यावेळी त्यांच्याबरोबर गाडी चालक व रुग्णालयातील एक मदतनीसही सोबत होते.

 

कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इनामदारवस्ती परिसरात आले असता पांढऱ्या रंगाच्या एर्टीगा कारने आलेल्या पाच अनोळखी इसमांनी त्यांची गाडी अडवली. आरोपींनी तिघांचे अपहरण करून धारदार शस्त्राचा धाक दाखवत फिर्यादीला मारहाण केली. तसेच एका आरोपीने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या दंडाला चावा घेतल्याचा प्रकार घडला.

आरोपींनी फिर्यादी, त्यांचे सहकारी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी देत 20 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. अखेर आरोपींनी जबरदस्तीने 19 लाख रुपये रोख स्वरूपात स्वीकारून तिघांना ताब्यात ठेवले. हा प्रकार सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू होता. फिर्यादी डॉक्टर यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी विलंब केल्याने सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमान्वये अज्ञात आरोपींवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल होताच उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग बापूराव दडस, पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सिद्ध पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Daily Horoscope: आजचा दिवस कोणासाठी लकी? ‘या’ 5 राशींना आर्थिक लाभाचे जोरदार योग

Tuesday, 28 July 2026, 7:36

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43
Next Post

Donald Trump Nobel Peace Prize: डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार; मारिया कोरिना मचाडो यांच्याबद्द्ल ट्रम्प म्हणाले...   

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.