Thursday, July 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भिगवण पोलिसांचा मध्यरात्री धडक सापळा; केबल चोरट्यांची टोळी जेरबंद

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Saturday, 27 June 2026, 20:02

भिगवण, दि. २७ (प्रतिनिधी) : उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात शेतकऱ्यांच्या विहिरीवरील वीज मोटारींच्या केबल चोरीच्या वाढत्या घटनांना अखेर भिगवण पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. गुप्त माहितीच्या आधारे मध्यरात्री राबविण्यात आलेल्या विशेष नाकाबंदीत केबल चोरी करणाऱ्या पाच जणांच्या अट्टल टोळीला अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून चोरीची ९८१ मीटर वीज केबल आणि एमएच-१२ क्यूडब्ल्यू-०९८५ क्रमांकाची ह्युंदाई अॅक्सेंट कार असा एकूण ६ लाख ३३ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या वीज मोटारींच्या केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनांची गंभीर दखल घेत भिगवण पोलिसांनी विशेष गस्त व नाकाबंदी मोहीम सुरू केली होती.

शनिवारी (दि. २७) पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास डिकसळ पोलिस चौकीसमोर नाकाबंदी सुरू असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, राशीनकडून भिगवणच्या दिशेने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या एका ह्युंदाई अॅक्सेंट कारमधून चोरीचा माल वाहून नेला जात आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून वाहन अडविले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विविध रंगांची ९८१ मीटर लांबीची वीज केबल आढळून आली. तसेच एमएच-१२ क्यूडब्ल्यू-०९८५ क्रमांकाची ह्युंदाई अॅक्सेंट कारही जप्त करण्यात आली.

 

या कारवाईत निलेश राजकुमार मोटे (वय २९, रा. सत्यम अपार्टमेंट, प्लॉट क्र. ८८, सेक्टर क्र. १९, खारघर, रायगड), मनोज गुलाब बिंद (वय ३७, रा. बरेनी, ता. कछवा, जि. मिर्झापूर, उत्तर प्रदेश), डब्लू बाबूलाल बिंद (वय ३१, रा. मिर्झापूर, उत्तर प्रदेश), विजयकुमार राशिंगार बिंद (वय २५, रा. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) आणि विशाल शिवराज बिंद (वय २०, मूळ रा. मिर्झापूर, उत्तर प्रदेश, सध्या गोपाळपट्टी, शेवाळवाडी फाटा, मांजरी, पुणे) यांना अटक करण्यात आली.

चौकशीदरम्यान आरोपींकडून केबल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली मिळाली असून, त्यांच्या विरोधात भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपासात या टोळीने केलेले आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर भट्टे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार अजित सरडे, प्रसाद पवार, गणेश पालसांडे, सचिन पवार, समीर झांबरे, रणजित मुळीक, महेश बोरुडे तसेच होमगार्ड राजेश लोंढे व स्वयंम वाघ यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस अंमलदार रामदास कचरे करीत आहेत.

 

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

हवामान खात्याची मोठी चेतावणी! पुण्यात पावसाचा हाहाकार माजणार? जाणून घ्या हवामान तज्ज्ञांचा मोठा गौप्यस्फोट

Thursday, 23 July 2026, 19:27

सणसवाडीतील कंपनीतून ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; दोन सराईत चोरटे जेरबंद

Thursday, 23 July 2026, 19:21

हनीमून मर्डर मिस्ट्रीत मोठा ट्विस्ट! पतीचा काटा काढणाऱ्या सोनम रघुवंशीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Thursday, 23 July 2026, 18:43

सहाय्यक अभियंत्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक! महावितरण कार्यालयात खळबळ

Thursday, 23 July 2026, 18:05

एक चप्पल अन् माती घसरल्याच्या खुणा… नाणेघाटात पर्यटनासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून खोल दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू

Thursday, 23 July 2026, 17:13
Krushi Nidhi

शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! कर्जमाफीची पहिली यादी आली; ‘ही’ अट पूर्ण नसेल तर लाभ हुकणार

Thursday, 23 July 2026, 16:48
Next Post

Jet4bet Casino Is known as the Home of Fair Play and Fast Payouts in Canada

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.