Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नवरा-बायकोसोबत राहत होता मित्र; संशयाच्या आगीत पेटला राग अन् घेतला जीव; शिक्रापूर येथील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 29 July 2026, 10:44

पुणे: पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एकाच खोलीत राहणाऱ्या मित्रानेच आपल्या साथीदाराचा गळा दाबून खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. एवढेच नाही तर हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने आपल्या 19 वर्षीय पत्नीची मदत घेत मृतदेह पोत्यात भरून निर्जन ठिकाणी फेकून दिला.

या प्रकरणाचा खुलासा 26 जुलै रोजी झाला. शिक्रापूरमधील करंजेनगर परिसरातील एका मोकळ्या जागेत झुडपांमध्ये पोत्यात बांधलेला मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी तपास सुरू केला. मृत व्यक्तीची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र तांत्रिक माहिती आणि गुप्त सूत्रांच्या मदतीने पोलिसांनी तपास वेगाने पुढे नेला.

तपासात मृतदेह गौरव ऊर्फ अक्षय अशोक वायकर (वय 24, मूळ रा. थेऊर, ता. हवेली) याचा असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यासोबत राहणाऱ्या व्यक्तींची चौकशी सुरू केली.

 

पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. गौरव हा करंजेनगर येथील एका खोलीत मुकेश विठ्ठल सोनवणे आणि त्याची पत्नी जान्हवी अनिल पाटोळे (वय 19) यांच्यासोबत राहत होता. मागील काही दिवसांपासून गौरव आणि मुकेश यांच्यात एका संशयावरून वारंवार वाद होत असल्याचे समोर आले.

याच वादातून मुकेशने 24 ते 26 जुलैदरम्यान गौरवचा गळा दाबून खून केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यानंतर मृतदेह लपवण्यासाठी मुकेशने पत्नी जान्हवीची मदत घेतली. दोघांनी मिळून मृतदेह पोत्यात भरला आणि तो निर्जन ठिकाणी नेऊन टाकला.

या प्रकरणी मृत गौरवची आई कांचन अशोक वायकर यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी मुकेश आणि जान्हवी या दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मित्रानेच मित्राचा जीव घेतल्याने शिक्रापूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणे-पिंपरी चिंचवडच्या वाहतुकीचा कायापालट होणार! HCMTR आणि E-RTS प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग

Wednesday, 29 July 2026, 13:28

‘परफेक्ट बॉडी’चं स्वप्न दाखवायचा अन् प्रतिबंधित इंजेक्शन्स विकायचा; पुण्यात जिम ट्रेनरचा काळा धंदा उघडकीस

Wednesday, 29 July 2026, 12:39

न्यायालयाच्या आदेशालाही सार्वजनिक बांधकाम विभागाचा ठेंगा! अभियंत्याच्या खुर्चीसह कार्यालयातील साहित्य जप्त; …अखेर लोणी काळभोर, वडकी, कुंजीरवाडीच्या शेतकऱ्यांचा विजय

Wednesday, 29 July 2026, 12:33

पुण्यात भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा दणका! गणेश, भवानी आणि नाना पेठेत FDA चा मोठा छापा; विनापरवाना साठवलेल्या चॉकलेट्स-कँडीज जप्त

Wednesday, 29 July 2026, 12:12

‘मी लय मोठा होऊन दाखवीन’ सांगून गायब झालेला आर्यन गवारे सुखरूप सापडला; उरुळी कांचन पोलिसांच्या अन् पालकांच्या तत्परतेमुळे 24 तासांत लागला शोध

Wednesday, 29 July 2026, 11:51

नीट फेरपरीक्षेचा पेपरही ३ दिवस आधीच फुटला होता? रोहित पवारांचा खळबळजनक आरोप; कागदपत्र दाखवत केला खुलासा

Wednesday, 29 July 2026, 11:30
Next Post

'मम्मी, मी तुला लय मोठा होऊन दाखवीन, मला शोधू नका प्लीज'; 16 वर्षांचा मुलगा अचानक गायब, उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.