पुणे : “आय एन एस शिवाजी” येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डी आर डी ओ विभागातील हवालदार हरेद्र सिंग यांनी “आय एन एस शिवाजी” येथे स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केली. दुपारी ही घटना घडली असून, अति सुरक्षित समजल्या जाणाऱ्या लोणावळा नजिक असलेल्या “आय एन एस शिवाजी” येथे सिंग हे पिस्तूल घेऊन कसे गेले आणि त्यांनी आत्महत्या का केली? याबाबत तपास सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच पुणे ग्रामीण पोलीस यांनी सुरु केला आहे. कौटुंबिक कारणातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.