पारगाव : आंबेगाव तालुक्यातील पारगाव गावाच्या हद्दीतील डिंभे उजव्या कालव्यावरील वितरिका क्रमांक एकच्या उपचारी क्रमांक एकची डावी उपचारी बुजवून शासकीय मालमतेची नुकसान केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पंधरा जणांवर पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रवीण मागाडे यांनी फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी निशा ज्ञानेश्वर अस्वारे, योगिता ज्ञानेश्वर अस्वारे, शांताबाई विष्णू बोरगे, चंद्रकांत पोपट लबडे, विजया संजय चांगण, राजाराम पोपट लबडे, गोरख दत्तात्रेय लबडे, सोनल संभाजी पाचारणे, मिलिंद दत्तात्रेय लबडे, जयश्री दत्तात्रेय लबडे, शकुंतला मच्छिंद्र लबडे, गोरक्षनाथ मच्छिंद्र लबडे, कांताराम मच्छिंद्र लबडे, सुरेखा चंद्रभान राहीज, अहिल्याबाई जालिंदर स्कटे (सर्व रा. पारगाव, ता. आंबेगाव) यांच्यावर शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारगाव गावच्या हद्दीत जमीन गट नंबर २४७ व २४८ मधील शेतकन्यांनी डिंभे धरणाची चारी बुजवून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. संबंधित शेतकऱ्यांना सदर चारी पूर्ववत करण्यासाठी १२ फ्रेबुवारी २०२४ ते २ मे २०२४ व ३० मे २०२४ रोजी वेळोवेळी समज पत्राद्वारे कळविण्यात आले. मात्र, संबंधित शेतकयांनी नोटीसीचे कोणतेही उत्तर न देता चारी पूर्ववत केली नाही. याबाबत ६ फ्रेबुवारी २०२४ रोजी डिंभे धरण उपविभाग क्रमांक दोनचे सहायक अभियंता यांनी या शेतकऱ्यांवर शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत लेखी आदेश दिले.
दरम्यान, कनिष्ठ अभियंता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंधरा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मडके पुढील तपास करत आहेत.