अजित जगताप
सातारा : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका भारती मदने व सुनिल मदने यांनी वाढदिवसानिमित्त खटाव तालुक्यातील डिस्कळ व तिरकवाडी (ता. फलटण) या शाळेला साऊंड सिस्टिम भेट देऊन आपले कर्तव्य पार पाडले.
शिक्षिका भारती मदने यांचं डिस्कळ हे माहेर आहे. त्याच शाळेमध्ये त्यांनी शिक्षण घेऊन पदवी मिळवली तसेच डीएड करून शिक्षिका म्हणून सातारा जिल्हा परिषद शाळेत सेवा करत आहेत.
त्यांच्यासमवेत त्यांच्या अनेक नातेवाईक मैत्रिणी यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले. त्या शाळेला नववर्षानिमित्त या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या साऊंड सिस्टिमचा संच भेट देऊन एक आदर्श निर्माण केलेला आहे.
आपण ज्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेले आहे. त्या शाळेच्या कृपेने शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांनी साऊंड सिस्टिम भेट दिला. तशाच पद्धतीने शिक्षक असलेले त्यांचे पती सुनिल मदने यांनी ही तिरकवाडी (ता. फलटण) या आपल्या गावात साऊंड सिस्टीम भेट दिला.
कर्मवीर भाऊराव पाटील, बापूजी साळुंखे आणि फुले दांपत्य यांनी केलेल्या कार्यामुळेच बहुजन समाजामध्ये शैक्षणिक क्रांती झालेली आहे.
या कार्यक्रमाला ललगुण केंद्राचे केंद्रप्रमुख प्रमोद जगदाळे, खटाव तालुक्याचे माजी उपसभापती लहुकूमार मदने, शंकर जाधव गुरूजी, काका गोडसे गुरूजी, शशिकला कर्णे, शिला माने, सुलभा कर्णे, पिया मुलाणी, अलका नाईक तसेच गजानन शिंदे, सुजाता भोईटे यांचा सत्कार करण्यात आला.
केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, शिक्षिका, मित्रपरिवार म्हासुर्णे गावचे ग्रामविकास अधिकारी सुतार व सुतार कल्याणी, रुपाली वीर, महावीर कर्णे व नातेवाईक उपस्थित होते.