बापू मुळीक
पुरंदर : पुरंदर तालुक्यातील पोखर या गावात युवकाने नायलॉनच्या दोरीने गोठ्यातील अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत संदिप बाजीराव पोमण (रा. पोखर ता पुरंदर जि. पुणे) यांनी पोलीसात फिर्याद दिली आहे. निलेश कुंडलीक पोमण वय 35 वर्ष (रा.पोखर ता. पुरंदर जि.पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काल (दि.3) दुपारी 2:00 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरा शेजारी निलेश पोमण यांच्या पत्नी मोनाली पोमण यांचा मोठ्याने ओरडल्याचा आवाज आल्याने तेव्हा फिर्यादी गेले असता त्यांना निलेशच्या घराशेजारील गोठ्या जवळ निलेशची पत्नी व गावातील लोक जमलेले दिसले.
तेव्हा गोठ्यात जाऊन बघितले असता. जनावरांना बांधायच्या पिवळ्या रंगाच्या नायलॉनच्या दोरीने निलेशने गोठ्याच्या ऍगलला गळफास घेतलेला होता. गावातील अर्जुन पोमण यांनी चाकुने दोरी कापुन निलेशला खाली उतरवले. असे फरियादीत म्हटले आहे. त्यानंतर निलेश याला खाजगी वाहनाने सासवड येथील हास्पीटलमध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. पुढील तपास सासवडचे पोलिस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी करीत आहेत.