योगेश शेंडगे
शिरूर : १९८ शिरूर विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या २९ ऑक्टोबर शेवटच्या दिवसापर्यंत २८ उमेदवारांची ४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर यांनी दिली आहे. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी बाळासाहेब मस्के उपस्थित होते.
दि. ३० ऑक्टोबर रोजी या उमेदवारी अर्ज यांची छाननी होणार असून सर्व उमेदवारांनी छाननीसाठी उपस्थित राहावे असे आवाहनही राजापूरकर यांनी केले आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवट दिवस असल्याने शिरूर शहरात व शिरूर तहसील कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात उमेदवारांचे समर्थक उपस्थित होते.
अर्ज दाखल करणारे उमेदवार पुढीलप्रमाणे…
१) अशोक रावसाहेब पवार,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (महविकास आघाडी)
२) ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष (महायुती),
३)भाऊसाहेब बाळासाहेब जाधव, समता पार्टी,
४)शिवाजी कुऱ्हाडे, रासप
५) शत्रुघ्न शिवाजी आपटे
६) नाथाभाऊ पाचर्णे,बहुजन मुक्ती पार्टी
७) प्रदीप कंद, अपक्ष ( भाजप बंडखोर)
८) शांताराम कटके,अपक्ष ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष,बंडखोर)
९)तुकाराम डफळ, सैनिक समता पार्टी
१०)रामकृष्ण बिडगर ,वंचित बहुजन आघाडी
११)गणेश दाभाडे ,अपक्ष जरांगे पाटिल गट
१२)प्रिया दशरथ कर्दळे
१३)पंढरीनाथ मल्हारी गोरडे, अपक्ष
१४)सुजाता अशोक पवार, अपक्ष
१५)प्रकाश सुखदेव जमदाडे,अपक्ष
१६) दत्तात्रय काळभोर,अपक्ष
१७)चंद्रशेखर घाडगे,
१८)जगदीश पाचर्णे ,अपक्ष
१९)सुरेश वाळके, अपक्ष
२०) संजय पाचंगे ,अपक्ष
२१) मनीषा ज्ञानेश्वर कटके, अपक्ष
२२) अशोक रामचंद्र पवार, अपक्ष
२३) अशोक गणपत पवार ,अपक्ष
२४) शिवाची ज्ञानदेव कदम ,अपक्ष
२५) विनोद वसंत चांदगुडे
२६) मारुती बाबुराव वाघचौरे
२७) राजेंद्र वाल्मीक कांचन
२८) विशाल शंकर सोनवणे
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवार येणार असल्याने, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी शिरूर तहसील कार्यालय व शहरात मोठ्या प्रमाणात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.