Friday, July 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

APK फाईल उघडताच खात्यातील ९० हजार रुपये गायब; लोणी काळभोर पोलिसांच्या तत्परतेने अवघ्या १५ दिवसांत संपूर्ण रक्कम परत

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 29 June 2026, 17:23

लोणी काळभोर, ता. २९ : सायबर गुन्हेगारांनी पाठविलेली एक APK फाईल उघडणे कदमवाकवस्ती येथील सफाई कामगार सागर विलास चव्हाण यांना चांगलेच महागात पडले. मुलांच्या शिक्षणासाठी काढलेल्या ९० हजार रुपयांच्या कर्जाची संपूर्ण रक्कम काही क्षणांत त्यांच्या बँक खात्यातून लंपास झाली. मात्र, लोणी काळभोर पोलिसांच्या सायबर तपास पथकाने तातडीने पाठपुरावा करत अवघ्या १५ दिवसांत ९० हजार रुपयांची संपूर्ण रक्कम परत मिळवून देण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सागर विलास चव्हाण (रा. घोरपडेवस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली) हे हडपसर परिसरातील एका खासगी संस्थेत सफाई कामगार म्हणून काम करतात. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी बँकेतून ९० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, ९ जून रोजी त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीकडून आलेली APK फाईल त्यांनी उघडताच मोबाईल काही काळासाठी बंद पडला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ९० हजार रुपयांची रक्कम अनधिकृतरीत्या वळती करण्यात आली.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चव्हाण यांनी तात्काळ महाराष्ट्र सायबर हेल्पलाईन १९३० वर तक्रार नोंदविली. त्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ऑनलाईन सायबर तक्रार क्रमांक ३१९०४२६००७१०९३/२०२६ दाखल करण्यात आला. तक्रारीनंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या सायबर तपास पथकाने तातडीने तपास सुरू केला. फसवणुकीतील ₹२०१ रक्कम ‘लीन’ अवस्थेत असल्याचे आढळून आल्यानंतर विविध बँका आणि संबंधित मर्चंटशी सातत्याने पत्रव्यवहार, समन्वय आणि पाठपुरावा करण्यात आला. या प्रयत्नांना यश येत फसवणुकीची संपूर्ण ९० हजार रुपयांची रक्कम अर्जदाराच्या खात्यात परत (Refund) मिळवून देण्यात आली.

 

ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस अंमलदार उषा थोरात आणि पोलीस अंमलदार योगेश पाटील यांनी सायबर तपास पथकाच्या माध्यमातून यशस्वीरीत्या पार पाडली.

दरम्यान, सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणूक झाल्यास नागरिकांनी वेळ न दवडता १९३० हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी किंवा https://cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार करावी, असे आवाहन लोणी काळभोर पोलिसांनी केले आहे. तातडीने तक्रार केल्यास फसवणुकीची रक्कम परत मिळण्याची शक्यता वाढते, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“श्रीमंतीचे खोटे आमिष, लग्नानंतर पैशांचा तगादा अन् मारवाडी साडीची सक्ती; लोणी काळभोरच्या विवाहितेचा अमानुष छळ, पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा!”

Friday, 31 July 2026, 15:33

पुणे विद्यापीठाचा कर्मचारीच निघाला मास्टरमाइंड! ७० हजार घेऊन दिली ‘बी.कॉम.’ची बोगस डिग्री; असं फुटलं घोटाळ्याचं बिंग

Friday, 31 July 2026, 15:27

सोन्याने पुन्हा घेतली उसळी! ‘इतक्या’ रुपयांनी वाढले दर; चांदी 2.20 लाखांच्या पार

Friday, 31 July 2026, 15:03

‘केवळ खासगी आस्थापनांनाच टार्गेट करणार का?” तुकाराम मुंढे यांच्या ‘एफडीए’ला हायकोर्टाचा दणका! मंत्रालयातील कॅन्टीनच्या स्वच्छतेवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

Friday, 31 July 2026, 14:57

पुण्याच्या पर्यावरणाबाबत धोक्याची घंटा! प्रदूषणाने पुणेकर हैराण, महापालिकेच्या सर्वेक्षणातून चिंताजनक वास्तव आलं समोर

Friday, 31 July 2026, 14:38

साखरपुड्याच्या आनंदात पार्थ पवारांना अश्रू अनावर; वडिलांच्या आठवणीने जीव झाला व्याकुळ, ‘तो’ भावनिक क्षण कॅमेरात कैद

Friday, 31 July 2026, 14:27
Next Post

हत्येच्या कटामागे आणखी कोण? सिया-चेतनच्या कोठडीसाठी कोर्टात पोलिसांचा मोठा दावा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.