-बापू मुळीक
सासवड (पुणे) : पुणे जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख पदी गराडे (ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायत सदस्या व ढोणेवाडीच्या रहिवासी अॅड. गीतांजली विजय ढोणे यांची निवड करण्यात आली. सदर निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गीतांजली ढोणे यांना देण्यात आले. यावेळी शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळे, आमदार अॅड. मनिषा कायंदे, संपर्कप्रमुख संजय मशिलकर, बारामती तालुका प्रमुख स्वप्निल जगताप आदीसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना सचिव संजय मोरे यांनी हे नियुक्तीपत्र दिले आहे. यामध्ये बारामती, शिरूर , पुणे शहर, मावळ लोकसभा मतदार संघ कार्यक्षेत्राच्या संपर्कप्रमुखपदी ही निवड करण्यात आली आहे. ॲड. गीतांजली ढोणे ह्या शिवसेना नेत्या असून त्या प्रसिद्ध वकील आहेत. त्यांचे माहेर पुरंदर तालुक्यातील पारगाव असून त्या शिवसेना नेते उद्योजक विजय ढोणे यांच्या पत्नी आहेत.
यावेळी बोलताना ॲड.गीतांजली ढोणे म्हणाले, वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाचा प्रचार आणि प्रसार सक्रियपणे सातत्याने करणार. तसेच सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या विकासासाठी कार्यरत राहणार आहे.
अॅड.गीतांजली ढोणे यांची पुणे जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील शिवसेना नेते पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.