-अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती (पुणे) : शिरुर तालुक्यातील दिव्यांगासाठी महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबीर दि.02 ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी ठिक 11.00 वा. निश्चित करण्यात आलेले होते.
परंतु प्रशासकीय कारणास्तव सदरचा दिव्यांगासाठी महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबीर हे दि. 02 ऑगस्ट 2024 ऐवजी दि. 06 ऑगस्ट 2024 वार मंगळवार रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता होणार आहे. महसूल सप्ताह-2024 अन्वये एक हात मदतीचा-दिव्यांगांच्या कल्याणाचा सह पंचायत समिती शिरुर येथील छत्रपती संभाजी सभागृह येथे हे घेण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.
सदर शिबीरामध्ये दिव्यांगांना सेतू, सुविधा केंद्रातून दिले जाणारे सर्व आवश्यक दाखले, संजय गांधी योजनेचा लाभ, आरोग्य तपासणी, यु. डी. आय.डी कार्डसाठी रजिस्ट्रेशन, पंचायत समिती मार्फत दिल्या जाणाऱ्या विविध योजना यांचा लाभ देण्यात येणार आहे. तरी सदर शिबीराचे शिरुर तालुक्यातील सर्व दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिरूरचे तहसिलदार बाळासाहेब मस्के, अव्वल कारकुन निलेश खोडसकर यांनी केले आहे.