राहुलकुमार अवचट
यवत : माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन या संघटनेची पुणे जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी जिल्हा अध्यक्षपदी राहूल बानगुडे, जिल्हा कार्याध्यक्षपदी मंगलदास निकाळजे (बारामती ) तर महिला जिल्हाध्यक्षापदी वैशाली दोरगे (भांडगाव) यांची निवड केली.
संघटनेच्या बैठकीची आयोजन शासकीय विश्रामगृह, पुणे येथे करण्यात आले होते. यावेळी ही नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर व ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील गुजर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
निवडीनंतर मनोगत व्यक्त करताना लवकरच बैठक घेऊन जिल्हा कार्यकारणी जाहीर केली जाईल असे जिल्हाध्यक्ष राहुल बानगुडे यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने कार्य करावे असे कार्याध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी तर महिला अध्यक्षा वैशाली दोरगे यांनी संघटनेत जास्तीत जास्त महिला सहभागी करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले.
सर्वसामान्य जनतेमध्ये माहिती अधिकार अधिनियम २००५ या कायद्याचा प्रसार व प्रचार करण्याचा संकल्प करून तो पूर्ण करावा अशी अपेक्षा सुभाष बसवेकर यांनी व्यक्त केली. जेष्ठ कार्यकर्ते सुनिल गुजर यांनी माहिती अधिकार कायद्याच्या सोबत जागरुक नागरिक म्हणून आपल्याला संविधान समजून घेऊन त्याचा जीवन व्यवहारात उपयोग करावा लागेल असे सूचित केले.
यावेळी सोशल मिडीया प्रमुख राहुल कदम व राज्य कार्यकारणी सदस्य राहुलकुमार अवचट यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पुणे शहर व जिल्हयातील सर्वच तालुकातील पदाधिकारी , महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.