पुणे : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने पुणे-दानापूर दिवाळी व छठ विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. २५ ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर दरम्यान २८ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. पुणे-दानापूर विशेष ट्रेन २५ ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर दरम्यान पुण्याहून रात्री सात वाजून ५५ मिनिटांनी सुटणार असून, तिसऱ्या दिवशी दानापूरला पहाटे साडेचार वाजता पोहोचणार आहे.
दानापूर-पुणे विशेष गाडी २५ ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर दरम्यान दानापूरहून सकाळी साडेसहा वाजता सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजून ३५ मिनिटांनी ही गाडी पुण्याला पोहोचणार आहे. या गाडीच्या १४ फेऱ्या असणार आहेत. या गाडीला दौंड मार्ग लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, दीनदयाल उपाध्याय, बक्सर आणि आरा असे थांबे देण्यात आले आहेत. या गाड्यांचे बुकिंग सहा सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.