Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: नागरिकांच्या खिशातील पैसे चोरणाऱ्या दोन सराईतांना अटक; सहकारनगर पोलिसांची कामगिरी

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 12 April 2025, 20:43
Tahsildar sent in judicial custody for exploiting wife in nanded

पुणे : पुण्यातील धनकवडीमध्ये पायी जाणार्‍या नागरिकाला जाणूनबुजून चोरीच्या उद्देशाने धक्का मारुन पाया पडण्याचा बहाणा करुन खिशातील पैसे चोरणार्‍या दोन सराईतांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. आस्लम इस्माइल शेख (वय 21 वर्ष, रा. नवीन म्हाडा, सातववाडी, हडपसर) आणि साद अकबर पठाण (वय 23, रा. वेस्टर्न गल्ली, सय्यदनगर, हडपसर) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याप्रकरणी, दीपक रामराव मोरे (वय 37, रा. धनकवडे पाटील टाऊनशिप, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना धनकवडीतील शाहू बँक चौकातील साईबा टी स्टॉलच्या बाजूला 9 एप्रिल रोजी घडली. फिर्यादी दीपक मोरे हे पायी जात असताना दुचाकीजवळ उभे असलेल्या दोघांनी त्यांच्या पाठीमागून येऊन त्यांना धक्का दिला. त्यानंतर धक्का लागल्यामुळे त्यांची माफी मागण्याकरीता पाया पडण्याचा बहाणा करुन त्यांच्या पँटच्या खिशामध्ये ठेवलेले 30 हजार रुपये नकळत काढून घेतले. त्यानंतर ते तिथून निघून गेले होते. याबाबत मोरे यांनी फिर्याद सहकारनगर पोलिस ठाण्यात दिली. तपास करीत असताना घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी अंती त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त करून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

दुसरी घटना उघडकीस…

दरम्यान, गुन्हेगारांच्या अधिक चौकशीत त्यांनी आणखी एका नागरिकाचे 10 हजार रुपये अशाच पद्धतीने चोरल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत कैलाश विश्वनाथ राजहंस (वय 51, रा. कात्रज गाव) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार धनकवडीतील शंकर महाराज मठाजवळ 18 ऑक्टोबर 2024 रोजी घडला होता. चोरट्यांनी कैलाश यांच्या खिशातील 10 हजार रुपये चोरले होते.

सदरची कामगिरी, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, बजरंग पवार, सागर सुतकर, किरण कांबळे, योगेश ढोले, महेश भगत, अमित पदमाळे, बालाजी केंद्रे, चंद्रकांत जाधव, महेश मंडलिक, खंडु शिंदे यांनी केली.

 
Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

गुगल पे, फोन पे, पेटीएम चालवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! २ ऑक्टोबरला यूपीआय ॲप्स बंद राहणार? व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे डिजिटल व्यवहारांना ब्रेक

Friday, 25 September 2026, 22:49

हडपसर येथील वॉव स्टे लॉजमधील खोलीत वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या; आरोपी वकिलाला अटक

Friday, 25 September 2026, 22:45

पुण्याच्या मानकरी बाप्पांना निरोप! ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन संपन्न

Friday, 25 September 2026, 22:10

अन् तिने पैशांसाठी स्वतःच्या लेकराला विकलं! लिव्ह-इन रिलेशनशिपमधून गरोदर राहिली अन् दारुड्या बॉयफ्रेंडला कंटाळून बाळाचा सौदा

Friday, 25 September 2026, 21:37

शिरूर पूर्वभागात डीजेच्या दणदणाटाला फाटा! टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप; पोलिसांकडून कौतुक

Friday, 25 September 2026, 21:16

गणेशोत्सवात शिक्रापूर पोलिसांचा दुहेरी फोकस! सायबर फ्रॉडसह महिला सुरक्षेबाबत जनजागृती; २७ गणेश मंडळांना भेट

Friday, 25 September 2026, 21:01
Next Post
Man cheated builder for 44 lakhs in pune

नोकरी लावण्याच्या आमिषाने ठेकेदारांकडून तरुणांना लाखो रुपयांचा गंडा; गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp