पुणे : पुणे शहरात कोयत्याचा वापर करुन रस्त्यांवर दहशत माजविण्याचे, लुटालुट करण्याचे प्रकार वाढत असताना, गुन्हे शाखेच्या पथकाने एक मोठी करवाई केली आहे.
तरुणाला कोयता पुरवणाऱ्या भोरी आळीतील एका दुकानदाराला अटक करून त्याच्या दुकानातून नवीन विक्रीसाठी ठेवलेले १०५ कोयते जप्त केले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, मध्य प्रदेश मधून दुकानदार कोयते मागवयचा. पोलिसांच्या तपासात दुकानदार पुण्यातील अनेक तरुणांना कोयते पुरवत असलेले निदर्शनास आले होते. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. तर त्याच्या दुकानातून १०५ कोयते जप्त करण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार पुण्यात मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.तर कोयता गॅंग घटनेतील अनेक आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.